Home /News /entertainment /

Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्धने संजनाला असं केलं बर्थडे विश, फोटो शेअर करत लिहिली खास पोस्ट

Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्धने संजनाला असं केलं बर्थडे विश, फोटो शेअर करत लिहिली खास पोस्ट

'आई कुठे काय करते' मालिकेत संजनाची नकारात्मक भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेचा (rupali bhosle) आज वाढदिवस आहे. यानिमित्त तिचा मालिकेतील पती अनिरुद्धने खास पोस्ट करत दिला वेगळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्यात.

    मुंबई, 29 डिसेंबर- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'ने (Aai Kuthe Kay Karte Latest Episode) अल्पावधीतच रसिकांच्या मनात घर केले आहे.या मालिकेत संजनाची नकारात्मक भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले (rupali bhosle) हिने साकारली आहे. भूमिका जरी नकारात्मक असली तरी रूपाली (rupali bhosle birthday) तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आज रूपाली भोसलेचा वाढदिवस आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. खरं तर ती मागच्या काही दिवसांपासून अॅडव्हान्स सेलिब्रेशन करत आहे. अशातच तिच्या एका जवळच्या आणि खास व्यक्तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. मिलिंद गवळीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत रूपाली भोसलेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मिलिंद गवळी मालिकेत अनिरुद्धची म्हणजे संजनाच्या पतीची भूमिका साकरतो. संजना आणि अनिरुद्ध यांच्या मालिकेत नकारात्मक भूमिके आहेत. मात्र असे असले तरी त्यांचा चाहता वर्ग देखीत तितकाच तगडा आहे. वाचा-1 की 29 डिसेंबर नेमका वाढदिवस कधी? रुपालीनेच केला दोन बर्थडेचा खुलासा मिलिंद गवळीने रूपालीसोबतचे काही खास फोटो शेअर  करत म्हटले आहे की,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रूपाली @rupalibhosleतिचा आदर्श वाक्य (Her moto of life)Love yourself first ...then you will be able to love others,आधी स्वतःवर प्रेम करा.. मग आपल्याला जगावर प्रेम करता येईल . That's so true...Respect yourself first , Take good care of yourself first , then you will be able to take care of others..And respect others..And she carries herself so elegantly , and beautifully..Happy Birthday Rupali. वाचा-अनघा-अभिषेक बांधणार लग्नगाठ; 'आई कुठे काय करते' मालिकेत दिसणार रेट्रो LOOK Actually , Normally लोकांचे वाढदिवस असतात पण रूपालीचा वाढमहिना असतो, birthmonth असतो, birthday नाही,पूर्ण डिसेंबर महिना, डिसेंबरच्या एक तारखेपासून 29 तारखेपर्यंत दररोज एक किंवा दोन केक ती कापते,असंख्य तिचे फॅन्स तिला महिनाभर केक पाठवत असतात,डिसेंबर महिन्यात जवळजवळ 40 केक's तिने कापले असतील.तिचा वाढदिवस आमच्या सेटवर कोणीच विसरू शकत नाही,महिनाभर ती सगळ्यांना त्याची आठवण करून देते,I think that is how one should live life, fullest,Life has to be celebrated all the time,You live once So LIVE king size , or according to Rupali , live life Queen Size...आनंद सिनेमा चा डायलॉग आठवतो" बाबू मोशाय जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही."आणि हे रूपाली कडून शिकायला मिळतं,कामाच्या बाबतीत तेवढीच श्रद्धा, वेळेचे महत्व, आपलं काम कसं चांगलं होईल ह्याचा सतत विचार करत रहाणं.
    जवळजवळ पाचशे एपिसोड्स आम्ही एकत्र काम केलं,आणि असा एकही सीन तिच्याबरोबर चा कधीही Dull,किंवा ज्यात full energy नाही, असा कधीच गेला नाही,सतत ती scene चा विचार , कुठे जागा काढता येतील,तो सीन आणखीन इंटरेस्टिंग कसा करता येईल याचा विचार,बरं संजना है कॅरेक्टर फार सोपं नाहीये, पहिल्या एपिसोड पासून ते कधीच सोपं नव्हतंच, पण रुपालीने ते कॅरेक्टर खूपच वेगळ्या level नेऊन ठेवलं आहे.आणि दोघेही भिन्न स्वभावाच्या आहेत , कॅरेक्टर संजना आणि प्रत्यक्ष रुपाली.आज वाढदिवसाच्या रुपाली भोसले ला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद,आयुष्याचा पुढचा प्रवास यशस्वी आणि सुखमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना....अशी कौतुक करणारी पोस्ट मिलिंदने लिहिली आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials

    पुढील बातम्या