मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

1 डिसेंबर की 29 डिसेंबर नेमका वाढदिवस कधी? रुपाली भोसलेनेच केला दोन बर्थडेचा खुलासा

1 डिसेंबर की 29 डिसेंबर नेमका वाढदिवस कधी? रुपाली भोसलेनेच केला दोन बर्थडेचा खुलासा

आई कुठे काय करते फेम रुपाली भोसले हिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर वाढदिवस (rupali bhosle birthday) साजरा करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. हे खास सेलिब्रेशन तिच्याच वाढदिवसाचं आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 29 डिसेंबर- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'ने  (Aai Kuthe Kay Karte Latest Episode) अल्पावधीतच रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत दररोज नवीन ट्वीस्ट पाहायला मिळतात. मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेत संजनाची नकारात्मक भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले (rupali bhosle) हिने साकारली आहे. भूमिका जरी नकारात्मक असली तरी रूपाली तिच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. रुपाली भोसले सोशल मीडियावर सक्रीय आहे. नुकताच रुपाली भोसले हिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर वाढदिवस (rupali bhosle birthday) साजरा करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. हे खास सेलिब्रेशन तिच्याच वाढदिवसाचं आहे. तिने हे फोटो 28 डिसेंबरला पोस्ट केल्याने सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगलेली आहे.

अभिनेत्री रुपाली भोसले हिची जन्म तारीख 29 डिसेंबर हीच आहे. यानंतर सर्वांना प्रश्न पडला आहे की, रुपालीने तिचा आधीच वाढदिवस कसा काय साजरा केला. याच उत्तर देखील रुपालीने स्वतःच फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये दिलं आहे. तिने कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, “माझा वाढदिवस 29 डिसेंबरला आहे. पण माझे कुटुंबीय माझा वाढदिवस दर वर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा करतात. त्यामुळे तिचा वाढदिवस दोनवेळा साजरा केला जातो.

तिच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे. आई कुठे काय करतेच्या सेटवर देखील तिच्यासाठी खास सरप्राइज देत देखील तिचा वाढदिवस साजरा केला आहे. तिची मेकअपरूम सजवली होती. याचे देखील तिनं व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यासोबतच रूपालीच्या कारचा देखील वाढदिवस आहे. कारन मागिल वर्षी तिनं याच दिवशी तिची कार खऱेदी केली होती. कारसोबतचा एक फोटो शेअर करत रूपालीने म्हटले आहे की,VerifiedHAPPY BIRTHDAY TO ME & MY CAR MY BABY ❤️❤️❤️Photo toh banta hai ❤️❤️❤️....

वाचा-Mazhi Tuzhi Reshimgath: नेहासमोर आली यशची खरी ओळख....

बिग बॉस मराठीमुळे झळकलेले एक नाव म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले. अनेक मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री रुपाली भोसले ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials