Home /News /entertainment /

'माझ्यासाठी कधी लढली तर वेळप्रसंगी ...'; आई कुठे काय करते फेम संजनाची आईसाठी खास पोस्ट

'माझ्यासाठी कधी लढली तर वेळप्रसंगी ...'; आई कुठे काय करते फेम संजनाची आईसाठी खास पोस्ट

आई कुठे काय करते या मालिकेत संजनाची भूमिका साकराणारी अभिनेत्री रूपाली भोसले ( rupali bhosle) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नुकतीच तिनं तिच्या आईसाठी एक पोस्ट लिहिली आहे.

  मुंबई, 26 जानेवारी- आई कुठे काय करते  (aai kuthe kay karte )  ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे. या मालिकेत संजनाची भूमिका साकराणारी अभिनेत्री रूपाली भोसले ( rupali bhosle) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. रूपालीची भूमिका मालिकेत जरी नकारात्मक असली तरी सोशल मीडियावर तिचा वेगळा चाहता वर्ग आहे. रुपालीने नुकतीच तिच्या आईसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. रूपालीने तिच्या इन्स्टावर आईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. कारण रूपालीच्या आईचा आज वाढदिवस आहे. रूपालीने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, हॅप्पी बर्थडे माय ब्युटीफूल... माझ्या आईसारखे कोण नाही. तिनं मला जन्म दिला, शिकवले तसेच कसे कपडे घालायचे शिकवले. माझ्यासाठी कधी ती लढली तर वेळप्रसंगी ओरडली देखील. असे जरी असले तरी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती माझ्यावर बिनशर्त प्रेम करते. माझी आई माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि ती किती शक्तिशाली आहे व तिचा माझ्यावर किती प्रभाव आहे याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत…आय लव्ह मम्मी...अशी पोस्ट रूपालीने आईसाठी लिहिली आहे.
  रूपाली भोसले नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. रूपालीला संजनाच्या भूमिकेने वेगळी ओळख दिली. काही दिवसापूर्वी तिला कोरोना झाला होता. यासाठी रूपालीने मालिकेतून ब्रेक घेतला होता. आता ती कोरोनातून बरी झाली आहे. मालिकेच्या शुटींगला देखील सुरू केले आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या