काही दिवसापूर्वी रूपाली भोसलेने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून कोरोना चाचणी पॉझि़टिव्ह आल्याची माहिती दिली होती. यानंतर . यानंतर सेटवरील सर्व कलाकारांची कोरोना चाचणीकरण्यात आली होती. यानंतर तिनं मालिकेतून ब्रेक घेतला होता. शिवाय रूपालीनं कोरोना नियामाचे पालन करत स्वतःला घरी क्वारंटाइन केले होतो. आता ती पूर्णपणे बरी झाली आहे. यानंतर तिनं मालिकेच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. वाचा-कोण आहेत मानेचे बोलवते धनी ?? Kiran Mane च्या वादात आता चित्रा वाघ यांची उडी कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा मनोरंजन विश्वाला मोठ फटका बसला होता. याचा परत फटका बसून नये व मालिकिचेचित्रीकरण थांबू नये म्हणून ही काळजी घेतली जात आहे. मात्र शेवटी मालिकेतील एका कलाकाराला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. वाचा-किरण्या तुझा बाजार उठला रे......, Kiran Mane ची मार्मिक पोस्ट चर्चेत मराठी मालिका 'आई कुठे काय करते' अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत नुकतेच अनघा आणि अभिचे लग्न झालं आहे. देशमुखांच्या घरात नवीन सुनबाई आल्या आहेत. आता अनघाच्या येण्यामुळे देशमुखांच्या घऱातील अरुंधतीची जागा भरून निघणार का असा प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडला आहे. कारण अरुंधतीप्रमाणे अनघा देखील कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेताना दिसते.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment