मुंबई, 16 जून: आई हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि आई नाही तर काही नाही असं याची वारंवार जाणीव करुन देणारी सर्वांची लाडकी मालिका म्हणजे आई कुठे काय करते
( Aai Kuthe Kay Kate) मालिकेत अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या घटस्फोटोमुळे देशमुख घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. संजनाच्या येण्यानं घरातील सगळेच अस्वस्थ आहेत. संजना घरातीलच एक आहे हे मानायला कोणीही तयार नाही. यासगळ्याचा मोठा परिणाम हा ईशावर
(Esha) झाला आहे. सध्या इशाच्या आयुष्यात सुरू असलेल्या गोष्टींमुळे तिला आईची किती गरज आहे हे आपल्याला मालिकेत पाहायला मिळत आहे. साहिलबरोबर झालेल्या ब्रेकअपमुळे ईशा पुन्हा विचलीत झालीय. अरुंधती तिची समजूत काढतच आहे पण आता तिची सावत्र आई म्हणजेच संजना देखील तिला खऱ्या आईचं प्रेम देताना दिसणार आहे. मालिकेत ईशा आणि संजना यांच्यातील एक फार इमोशल सीन पाहायला मिळणार आहे.
आई कुठे काय करते मालिकेच्या येत्या भागात आपण पाहणार आहोत की, ईशा आणि साहिल बोलत असताना अरुंधीत इशाला बळजबरी घरी घेऊन येते. ती ईशाला ओरडते. अरुंधती ओरडल्यामुळे इशा फार चिडते. तेव्हा ईशाची समजूत घालण्यासाठी संजना तिला रुममध्ये घेऊन येते. बिथरलेल्या आणि कन्फूज ईशाला संजना समजूतदारपणाचे धडे देते. यावेळी दोघींमध्ये झालेला संवाद फारच भावूक आहे.
हेही वाचा -
Rang Majha Vegla: आधी कार्तिकसाठी केली वडाची पूजा; आता दीपाच लावून देणार कार्तिकचंं आयेशाशी लग्न, मालिकेत मोठा ट्विस्ट
'लग्न अशा माणसाशी करू नये ज्याच्यावर आपलं जीवापाड प्रेम आहे, लग्न अशा माणसाशी करावं ज्याचं आपल्यावर जीवापाड प्रेम आहे', असं सांगत संजना इशाला समजावण्याचा प्रयत्न करते.
संजना ईशाला समजवत असताना अनिरुद्ध दोघींच बोलणं ऐकतो. संजना ज्या प्रेमानं आणि मायेनं ईशाची समजूत घालत असेत ते पाहून तोही इमोशन होतो. संजनालाही काहीही न बोलता अनिरुद्धसमोरुन निघून जाते.
मालिकेत आजवर आपण संजनाला प्रोफेशनल, स्वार्थी म्हणून पाहत आलो आहोत. पण संजना किती इमोशन आहे हे देखील अनेकवेळा दाखवण्यात आलं आहे. संजनानं अनेकवेळा ईशाला अरुंधतीच्या विरोधात भडकवलं आहे पण तीच संजना आता अरुंधतीची बाजू मांडत ईशाला योग्य मार्ग दाखवताना दिसत आहे. ईशाला आईचं प्रेम देताना दिसत आहे. संजनामध्ये झालेला हा बदल अनिरुद्धला कळणार का? तिच्या बदललेल्या स्वभावानंतर अनिरुद्ध दोघांच्या घटस्फोटाचा निर्णय मागे घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.