Home /News /entertainment /

अभिनेते मिलिंद गवळींच्या वाढदिवसाची धम्माल! आधी सेलिब्रेशन मग रुपाली भोसलेवर आली झाडू मारायची वेळ

अभिनेते मिलिंद गवळींच्या वाढदिवसाची धम्माल! आधी सेलिब्रेशन मग रुपाली भोसलेवर आली झाडू मारायची वेळ

अभिनेते मिलिंद गवळींच्या वाढदिवसाची धम्माल! आधी सेलिब्रेशन मग रुपाली भोसलेवर आली झाडू मारायची वेळ

अभिनेते मिलिंद गवळींच्या वाढदिवसाची धम्माल! आधी सेलिब्रेशन मग रुपाली भोसलेवर आली झाडू मारायची वेळ

आई कुठे काय करते मालिकेच्या कलाकारांनी केक कटिंग करत डेकोरेशनसहीत अभिनेते मिलिंद गवळींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मिलिंद गवळींच्या वाढदिवसाची धम्माल मात्र संजनाला म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेला ( Rupali Bhoale) चांगलीच महागात पडलीय.

पुढे वाचा ...
  मुंबई, 16 जून:  आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte) फेम अनिरुद्ध ( Aniruddha) म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी ( Actor Milind Gawali Birthday) आज त्यांचा 56वा वाढदिवस साजरा करत आहेत.  वयाच्या 56व्या वर्षीही फिट अँड फाइन हँडसम मिलिंद गवळी यांची फॅन फॉलोविंगही प्रचंड आहे.  मिलिंद यांना संपूर्ण सिनेसृष्टीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत.मालिकेच्या सेटवरही मिलिंद गवळी यांच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. कलाकारांनी केक कटिंग करत डेकोरेशनसहीत मिलिंदना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मिलिंद गवळींच्या वाढदिवसाची धम्माल मात्र संजनाला म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेला ( Rupali Bhoale) चांगलीच महागात पडलीय. सेलिब्रेशननंतर रुपालीला चक्क झाडू मारावी लागली आहे. बिचाऱ्या रुपालीला पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरलेलं नाही. आई कुठे काय करतेच्या सेटवर मिलिंद गवळींच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो कलाकारांनी शेअर केलेत. अभिनेत्री गौरी कुलकर्णीनं ( Gauri Kulkarni) संजनाचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे ज्यात रुपाली भोसले झाडू मारताना दिसत आहे. 'रुपाली ताई भोसले झाडू मारताना', असं कॅप्शन देत गौरी हसताना दिसत आहे. रुपालीही तिला व्हिडीओमध्ये हसत हसत धम्माल एक्सप्रेशन्स देताना दिसतेय. मिलिंद गवळींची बर्थ पार्टी रुपालीच्या चांगलीच अंगलट आल्याचं दिसत आहे. सध्या या व्हिडीओला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे. हेही वाचा - IPS कीर्तीवर आली ट्रॅफिक हवालदार होण्याची वेळ; असं काय झालं की जीजीआक्का मागणार भररस्त्यात माफी मिलिंद गवळी सगळ्यांचेच आवडते सहकलाकार आणि इन्स्पिरेशन आहेत.  संजना आणि मिलिंद यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्रीतर पडद्यावर पाहतोच पण त्यांची ऑफ स्क्रिन केमिस्ट्री आणि मैत्री देखील तितकीच उत्तम आहे. मिलिंग गवळींच्या वाढदिवसाला रुपालीनं दोघांचा धम्माल व्हिडीओ पोस्ट करत शुभेच्छा दिल्यात, तिनं म्हटलंय, 'तुमची पुढील सगळी वर्ष खूप आनंदात जावो. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि भरभरुन प्रेम. माझी इच्छा आहे की तुमची सर्व स्वप्न तुम्ही पूर्ण करा आणि तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळो. तुम्ही अनेकांसाठी प्रेरणा आणि आदर्श आहात. तुमचा खास दिवस आनंदाने प्रेमाने भरुन जावो'.
  रुपालीच्या या सुंदर शुभेच्छांना रिप्लाय देत मिलिंग गवळींनी म्हटलंय, 'रुपाली तुझ्याकडून वाढदिवसाच्या इतक्या प्रेमळ शुभेच्छा मिळाल्या आनंद झाला. खरंतर तू देखील अनेकांसाठी प्रेरणा आणि आदर्श आहेस. तु कामासाठी घेत असलेली मेहनत तुझं डेडिकेशन,कामात असलेला प्रोफेशनलपणा यामुळे आम्हाला नेहमीच ऊर्जा मिळत आली आहे'.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi entertainment, Tv actor, Tv actors, Tv actress, Tv celebrities, TV serials, Tv shows

  पुढील बातम्या