मालिकेत एकीकडे अरुंधतीची प्रतिमा दूषित करताना मात्र दुसरीकडे अनिरुद्ध अरुंधतीला move on होण्याचा सल्ला देताना दिसत आहे. घरच्यांसाठी खूप केलंस आता आशुतोषचा विचार कर asa सल्ला अनिरुद्ध तिला देतो. अरुंधतीला लग्न करण्याबद्दलसुद्धा अनिरुद्ध बराच आग्रही आहे.View this post on Instagram
शर्वरी वाघने फ्लॉन्ट केला बोल्डनेस, PHOTOS ना चाहत्यांकडून मिळतेय पसंती
मागे आशुतोषला रुग्णालयात दाखल केलं असताना अनिरुद्धने फारच बदललेली आणि चांगली भूमिका घेतली. त्याचा एकूण बदललेला रवैय्या बघून प्रेक्षकांना अनिरुद्ध अखेर सुधारला का अशी शंका आली. मात्र हा अनिरुद्धच्या कटाचा भाग आहे अशी चिन्ह आत्ता दिसत आहेत. अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी आणि इतर कलाकार यांना या मालिकेमुळे अफाट प्रसिद्धी मिळाली. घराघरात त्यांना मालिकेतल्या भूकिकेमधून ओळखलं जातं. या मालिकेची सर्वत्र फार चलती आहे आणि लोकं न चुकता ही मालिका बघतात. अनिरुद्धच्या या बेरकी वागण्याने मालिका कोणतं नवीन वळण घेते हे पाहणं रंजक ठरेल.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aai Kuthe Kay Karte, Marathi actress, Marathi entertainment, Tv serial