मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'अनिरुद्ध देशमुख सुधारला तर...'; Aai Kuthe Kay Karte फेम मिलिंद गवळींची भावनिक पोस्ट चर्चेत

'अनिरुद्ध देशमुख सुधारला तर...'; Aai Kuthe Kay Karte फेम मिलिंद गवळींची भावनिक पोस्ट चर्चेत

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिका एक वळणावर असताना अनिरुद्धच्या व्यक्तिरेखेसाठी मिलिंद गवळी यांनी एक खास पोस्ट केली आहे. सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिका एक वळणावर असताना अनिरुद्धच्या व्यक्तिरेखेसाठी मिलिंद गवळी यांनी एक खास पोस्ट केली आहे. सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिका एक वळणावर असताना अनिरुद्धच्या व्यक्तिरेखेसाठी मिलिंद गवळी यांनी एक खास पोस्ट केली आहे. सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.

मुंबई, 28 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिकापैकी एक मालिका आहे. मालिकेत दररोज नवीन ट्वीस्ट ' (Aai Kuthe Kay Karte Latest Episode) पाहायला मिळतात. अरूंधतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अनिरूद्धने संजनासोबत लग्न केलं आहे. अशातच अरूंधतीनं अविनाशची नड काडण्यासाठी राहत घऱ गहान ठेवलं आहे. त्यामुळे आता या घऱातील त्याचा हिस्सा विकणार आहे. त्यामुळं सगळीकडं अनिरूद्धच्या या निर्णयाची चर्चा आहे. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका मिलिंद गवळी (milind gavali )यांनी साकारली आहे. भूमिकेला नकारात्मक शेड असली तरी या मालिकेमुळे त्यांना प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आहे. आता मालिका एक वळणावर असताना अनिरुद्धच्या व्यक्तिरेखेसाठी मिलिंद यांनी एक खास पोस्ट केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोबत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर करत आहे.

मिलिंद आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हणतात की, आयुष्याच गणित बिघडलं की ते सुधारता येईल का? अनिरुद्ध देशमुख एकामागे एका मागे एक चुका करत चाललाय, बारा-तेरा वर्षापूर्वी त्याच्या आयुष्याचं गणित चुकलं, त्याच्याकडून एक चूक झाली, ती अनिरुद्ध ला सुधारता आली असती का?

वाचा :' या ' सिनेमात पहिल्यांदाच Tiger Shroff आणि Amitabh Bachchan दोघांचं अनोखं नातं

आली असती तर अनिरुद्ध सारखा सुखी माणूस कोणीच नसतात, आणि त्याच्याबरोबर त्याचा परिवार ही सुखी राहिला असता, असं म्हणतात ना की एक खोटं लपवण्यासाठी 100 वेळा खोटे बोलावे लागते, तसंच आयुष्यात एक मोठी चूक केली की त्याच्या मागे तुम्ही शंभर चुका करत राहता.

वेळीस जर ती चूक कबूल करून सुधारली नाही तर आयुष्याची फडफड होऊ शकते, फक्त त्याची स्वतःची नाही तर त्याच्याबरोबर जोडलेल्या त्याच्या नातेवाईकांची मित्रमंडळींची स्वकीयांची सगळ्यांची, किती घरांमध्ये हीच परिस्थिती आहे.मनं दुखावली जातात, काहींमध्ये अहंकार असतो, दुसऱ्यांचा विचार करत नाहीत, लोकं स्वार्थी होतात, आणि मग त्याच्यावर एकच उपाय, उपाय म्हणजे , "त्यापेक्षा आपण वेगळे राहूया" आणि लोक वेगळी होतात, त्यात सगळ्यांचं नुकसान होतं, कळत नाही

बऱ्याच लोकांना, एकत्र कुटुंब सारखं सुख या जगामध्ये कुठेच नाही,आई वडील आजी आजोबा मुली सुना नातवंड पतवंडं काका मावशी आत्या मामा आणि काही अतिशय जवळची मित्रमंडळी, हल्ली दिवाळी ला सुद्धा एकत्र येत नाहीत.

वाचा :Aai Kuthe Kay Karte मालिकेत होणार या दिग्गज अभिनेत्रीची एंट्री

हे सगळं बदलेल का? येतील का लोक परत एकत्र छान सण साजरा करायला, दुरावलेली माणसं परत एकत्र आली किती मजा येईल, अनिरुद्ध देशमुख सुधारला तर किती मजा येईल? डोळे उघडतील का त्याचे?..Hopefully... अशा अशयाची त्यांनी पोस्ट केली आहे. यासोबतच्या व्हिडीओमध्ये अनिरूद्ध त्याचा घर विकण्याचा निर्णय आई आप्पांना सांगताना दिसत आहे. यामुळे देशमुखांच्या घराचे दोन भाग होणार आहेत. हे सगळं अनिरूद्धच्या एक निर्णयामुळे होत आहे . यावरच आधारित मिलिंद यांनी पोस्ट केली आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या यो पोस्टखाली त्यांच्या अभिनयाचे कौतुक केलं आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials