मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aai Kuthe Kay Karte मालिकेत नवा ट्विस्ट, अरुंधतीने घेतला मोठा निर्णय; पाहा Video

Aai Kuthe Kay Karte मालिकेत नवा ट्विस्ट, अरुंधतीने घेतला मोठा निर्णय; पाहा Video

अरुंधतीच्या नोकरीचं ठिकाण देशमुखांच्या समृद्धी बंगल्याजवळ आहे. म्हणूनच अरुंधतीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

अरुंधतीच्या नोकरीचं ठिकाण देशमुखांच्या समृद्धी बंगल्याजवळ आहे. म्हणूनच अरुंधतीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

अरुंधतीच्या नोकरीचं ठिकाण देशमुखांच्या समृद्धी बंगल्याजवळ आहे. म्हणूनच अरुंधतीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

  मुंबई, 07 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte Latest Episode) या मालिका टीआरपीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर आहे. मालिकेत सुरू असलेल्या कथानकाप्रमाणे (Aai Kuthe Kay Karte Latest Update) अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या घटस्फोटानंतर संजनाने घराचा ताबा घेतला आहे. अरुंधतीच्या शब्दाखातर अनिरुद्धने संजनाशी लग्न केलं खरं, पण यानंतर देशमुखांच्या घरातील शांतता मात्र पार हद्दपार झाली आहे. देशमुखांचे हसतं-खेळतं घर पुरतं कोलमडलं आहे. गणेशोत्सवानंतर अरुंधती आईकडे डोंबिवलीला परतली आहे. तिची आश्रमाच्या ऑफिसातली नोकरीही सुरू झाली आहे. त्यामुळेच ती त्यात व्यस्त आहे. तर इथे संजना मात्र बेकार झाली आहे. विविध ठिकाणी नोकरीसाठी इंटरव्ह्यू देत फिरत आहे. संजनाला घरकाम अजिबातच येत नाही आणि विमलशी तिचं पटत नाही यावरुन आज्जी आणि तिच्यात सतत खटके उडतायत. म्हणूनच संजनाने तिच्या आणि अनिरुद्धसाठी एक नवी बाई कामाला ठेवली आहे. या घरकामावरून कांचन आजी आणि संजनामध्ये सारखे खटके उडत आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  अरुंधती डोंबिवलीला राहत आहे आणि तिच्या नोकरीचं ठिकाण बोरिवली म्हणजे देशमुखांच्या समृद्धी बंगल्याजवळ आहे. म्हणूनच अरुंधतीने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आई-आप्पा आणि मुलांच्या खाण्या-पिण्याची आबाळ होणार नाही. अरुंधती आता देशमुखांच्या घरासमोर गौरीकडे राहायला आली आहे. हे संजनाला समजताच तिचा मात्र पुरता तिळपापड होणार आहे. अरूंधतीचा हा निर्णय प्रेक्षकांना पटणार की नाही हा येणारा काळच सांगेल. वाचा : Navratri Spl : नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी हळदीच्या रंगात नटल्या मराठी तारका, पाहा Photos यामुळे मालिकेत कोणता नवा ट्ववीस्ट पाहण्यास मिळणार का याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.सोशल मीडियावर देखील या भागाची चर्चा रंगलेली आहे. यासोबतच पुन्हा देशमुखांच्या घऱाजवळ पाहून अरूंधतीला पाहून नेटकरी यावर कशा प्रतिक्रिया देणार याची देखील उत्सुकता आहे. काहींना यावरून संजनाला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे व अरूंधतीच्या निर्णयाला पांठिबा दिला आहे. वाचा :आर्यन खानला पाठिंबा देणाऱ्या हृतिकवर drama queen कंगनाने साधला निशाणा ट्रोलिंग नंतर मालिकेच्या कथानकात काही बदल होणार का? 'आई कुठे काय करते' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. इतकेच नाही तर या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. मात्र सध्या ही मालिका नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. मालिकेत अरूंधतीचा प्रेमळ आणि सगळ्यांना सांभाळून घेणारा स्वभाव सर्वांनाच आवडत असला तरी सध्या दाखवण्यात येत असलेले कथानक प्रेक्षकांना फारसे पटत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मालिकेला विरोध होताना दिसत आहे.आई कुठे काय करते मालिकेविरोधात प्रेक्षक सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आता ही मालिका बंद करा, काय फिरवली आहे मालिका, कुणी तरी या अरुंधतीला थांबवा, ही अरुंधती काय लेडी जेम्स बॉन्ड आहे का ?, चांगल्या मालिकेची पुन्हा माती केली, अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. मात्र ट्रोलिंग नंतर मालिकेच्या कथानकात काही बदल होणार का,असा देखील प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडला आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials

  पुढील बातम्या