मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Aai Kuthe Kay Karte मालिकेत होणार या दिग्गज अभिनेत्रीची एंट्री

Aai Kuthe Kay Karte मालिकेत होणार या दिग्गज अभिनेत्रीची एंट्री

Aai Kuthe Kay Karte मालिकेत अभिनेता समीर धर्माधिकारी याच्या एंट्रीची चर्चा रंगली असतानाच आता आणखी एक ट्वीस्ट समोर आला आहे. कारण लवकर मालिकेत एका दिग्गज अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.

Aai Kuthe Kay Karte मालिकेत अभिनेता समीर धर्माधिकारी याच्या एंट्रीची चर्चा रंगली असतानाच आता आणखी एक ट्वीस्ट समोर आला आहे. कारण लवकर मालिकेत एका दिग्गज अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.

Aai Kuthe Kay Karte मालिकेत अभिनेता समीर धर्माधिकारी याच्या एंट्रीची चर्चा रंगली असतानाच आता आणखी एक ट्वीस्ट समोर आला आहे. कारण लवकर मालिकेत एका दिग्गज अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.

मुंबई, 28ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिकापैकी एक मालिका आहे. मालिकेत दररोज नवीन ट्वीस्ट ' (Aai Kuthe Kay Karte Latest Episode) पाहायला मिळतात. मागच्या काही दिवसापासून मालिकेत अभिनेता समीर धर्माधिकारी याच्या एंट्रीची चर्चा रंगली असतानाच आता आणखी एक ट्वीस्ट समोर आला आहे. कारण लवकर मालिकेत एका दिग्गज अभिनेत्रीची एंट्री होणार असल्याचे समोर आलं आहे.

अरुंधती सध्या महिलांसाठी काम करणा-या एका सेवाभावी आश्रमात काम करत आहे. या आश्रमाच्या ट्रस्टी सुरेखाताई आश्रमाला भेट देतात, तेव्हा अरुंधतीचं गाणं त्यांच्या कानी पडतं. या ट्रस्टींची भूमिका प्रसिध्द अभिनेत्री ईला भाटे (Ila Bhate) साकारताना दिसणार आहे. त्या बऱ्याच कालावधीनंतर या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यामुळे आई कुठे काय करतेच्या आगामी भागांची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

यासोबतच अभिनेता समीर धर्माधिकारी याची देखील मालिकेत एंट्री होणार असल्याची चर्चा आहे. तो अरुंधतीच्या मित्राची भूमिका साकरणार असल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या वक्तीच्या येण्यामुळे अरूंधतीच्या आयुष्यात काय बदल होणार तसेच यामुळे मालिकेच्या कथानकवर काय परिणाम होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे या दोन कलाकारांच्या एंट्रीमुळे मालिकेच्या टीआरपीवर कसा परिणार होणार हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

वाचा : “हे बघ भावा तुझा पोरगा दोषी....” ; मराठी अभिनेत्याची ती पोस्ट चर्चेत

अविनाशची कर्जाची नड भागविण्यासाठी अरुंधतीने यशच्या मदतीने व आप्पांच्या कानावर घालून राहतं घरं गहाण ठेवलंय. समृद्दीमधील तिचा हिस्सा तारण ठेवत पैसा उभा केला आणि अविनाशला मरणयातना भोगण्यापासून वाचवलं आहे.सुरुवातीला याबाबत कुणालाच माहिती नव्हती. ते फक्त यश, आप्पा आणि अरुंधती यांनाच हे माहिती होते. यश जेव्हा गौरीला हे सांगत होता तेव्हा संजनाने हे ऐकले. त्यानंतर तिने याचा उपयोग करत देशमुखांच्या घरात यांचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता सर्वांच्या मनात अरुंधतीबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातच अनिरूद्धच्या घर विकण्याच्या निर्णयामुळे समृद्धीचे दोन भाग होणार का..या सगळ्याचा देशमुख कुटुंब, अरूंधती कसा सामन करणार हे पाहावे लागेल. अरूंधती पैशाची व्यवस्था करून अनिरूद्धचा निर्णय बदलेल का ..अशा अनेक प्रश्न आता प्रेक्षकांना सतावत आहे.

वाचा : VIDEO: अभिनेत्री नव्हे तर हा आहे बॉलिवूडचा चॉकलेट बॉय; ओळखलं का स्त्री वेशातील..

यासोबतच आता लवकरच अनिरूद्ध त्याचा हिस्सा म्हणजे घराचा एक भाग विकणार आहे. त्यामुळे हे घर कोण घेणार त्याचा आणि मालिकेतीस या न्यू एंट्रीचा काही संबंध आहे का, हे येणाऱ्या भागात समजणार आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Tv serial