Home /News /entertainment /

अभिच्या लग्नातून अनिरुद्ध आशुतोषला हकलवणार ; अरुंधती मित्राची बाजू घेत अनिरुद्धला सुनावणार खडे बोल

अभिच्या लग्नातून अनिरुद्ध आशुतोषला हकलवणार ; अरुंधती मित्राची बाजू घेत अनिरुद्धला सुनावणार खडे बोल

सध्या आई कुठे काय करते मालिकेत लगीनघाई सुरु झालीय. बऱ्याच दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती त्या अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे.

  मुंबई, 5 जानेवारी- मराठी मालिका आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं अतूट नातं आहे. प्रत्येक मालिकेला प्रेक्षक प्रेम आणि आपुलकी देत असतात. त्यामुळेच सध्या अनेक मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. त्यातीलच एक मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karate)  होय. या मालिकेला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे. मालिकेच्या प्रत्येक भागासाठी चाहते उत्सुक असतात. मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट येतच असतात. त्यामुळे प्रेक्षकवर्ग अक्षरशः खिळून राहतो. मालिकेत सध्या फारच इंटरेस्टिंग भाग सुरु आहे. सध्या आई कुठे काय करते मालिकेत लगीनघाई सुरु झालीय. बऱ्याच दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती त्या अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. या विवाहसोहळ्यासाठी संपूर्ण देशमुख कुटुंब उत्साहात आहेत. मात्र त्यांचा हा उत्साह जास्त काळ टिकणार नाही. ऐन लग्नातच अनिरुद्ध या आनंदावर पाणी सोडणार आहे. अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळ्याचे संगीत, मेंदी, हळद या कार्यक्रमाची सध्या सोशल मीडियावर धूम आहे. प्रेक्षक देखील अनघा व अभिषेकच्या लग्नाच्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. अशातच मालिकेत एक नवीन ट्वीस्ट येणार असल्याचे समोर आलं आहे. अनघा आणि अभिषेकच्या लग्नात अनिरुद्ध आणि अरुंधतीचा मित्र आशुतोषमध्ये भांडण होणार आहे. यानंतर आशुतोषला अनिरुद्ध भरलग्नातून हाकलून लावणार असल्याचं समोर आलं आहे. मात्र अरूंधती यावेळी गप्प बसणार नाही. ती सर्वांसमोर तिच्या मित्राच्या बाजू घेताना दिसणार आहे. याशिवास यावरून ती अनिरुद्धला खडेबोल देखील सुनावणार आहे. आई कुठे काय करते मधील या नवीन ट्वीस्टाची प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.
  आशुतोष हा अरूंधीतचा कॉलेजचा मित्र आहे. आशुतोषचं अरुंधतीवर प्रेम आहे मात्र त्यानं ते तिच्यासमोर आजपर्यंत कधीही व्यक्त केलेले नाही. असं जरी असलं तरी तो अरुंधतीच्या मैत्रिची देकील तितकीच कदर करतो. या दोघांच्यातील मैत्री निखळ दाखवण्यात आली आहे. अभिच्या संगीत सोहळ्यात देखील अरुंधती आणि आशुतोषला एकत्र डान्स करताना पाहून अनिरुद्धचा चांगलाच तिळपापड झाला होता. याशिवाय त्याच घरी येणं देखील अनिरुद्धत फारसं आवडत नाही. त्यामुळे आता याचा सगळ्याचा उद्रेग कधी ना कधी होणार होताच. कधाचित तो अभिषेक आणि अनघाच्या लग्नात होण्याची शक्यता आहे. वाचा-Deepika Padukone Net Worth:अभिनेत्रीकडे आहे इतक्या कोटींची संपत्ती अनघा आणि अभिषेकच्या नुकत्याचा पार पडलेल्या संगीत सोहळ्यात देशमुख कुटुंबाने रेट्रो लूक कॅरी केला होता. अनिरुद्ध-संजना, अभिषेक-अनघा, माई-अप्पा, यश-गौरी आणि इशाने सदाबहार मराठी गाण्यांवर ठेका धरत संगीत सोहळ्याची रंगत द्विगुणीत केली होती. आता सर्वांना लग्नाची उत्सुकता लागली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment, Tv serial, Zee marathi serial

  पुढील बातम्या