• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • Aai Kuthe Kay Karte : 'आवाज खाली...' म्हणत अरुंधतीने अनिरुद्धला दिली चांगलीच समज

Aai Kuthe Kay Karte : 'आवाज खाली...' म्हणत अरुंधतीने अनिरुद्धला दिली चांगलीच समज

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत अनिरूद्ध नेहमीप्रमाणे अरूंधतीवर ओरडतो. मात्र यावेळी अरूंधती त्याचं न ऐकता ओरडायला मी तुमची बायको नाही असं म्हणत चांगलीच खडसावते.

  • Share this:
    मुंबई, 25 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिकापैकी आहे. ही मालिका सध्या एक रंजक वळणावर आहे. मालिकेत दररोज नवीन ट्वीस्ट ' (Aai Kuthe Kay Karte Latest Episode) पाहायला मिळतात. अनिरुद्ध आणि अरुंधती यांचा घटस्फोट झाल्यानंतर देशमुख कुटुंबात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. संजना लग्न करून घरात आल्यामुळे दररोज नवनवीन वाद रंगत आहेत. अविनाशची कर्जाची नड भागविण्यासाठी अरुंधतीने यशच्या मदतीने व आप्पांच्या कानावर घालून राहतं घरं गहाण ठेवलंय. आता हे सगळं समजल्यानंतर संजना आई आणि आप्पांना सुनावत आहे. यावेळीच तेथे अनिरूद्ध आणि अरुंधती येतात आणि त्यांच्यात वाद होतो. यावेळी अनिरुद्ध नेहमीप्रमाणे अरुंधतीवर ओरडतो त्यावेळी मात्र अरुंधती त्याला चांगलीच समज देते. स्टार प्रवाहवर नुकताच एक प्रोमो प्रसिद्ध झाला आहे यामध्ये अरूंधती अनिरूद्धला चांगलीच समज देताना दिसत आहे. संजना आई आप्पांना घर गाहणं ठेवण्यावरून सुनावत असते. उद्या अविनाश पैसे घेऊन पळून गेला तर तुम्ही आणि अरूंधती रस्त्यावर याल असं संजना म्हणत असंते हे सगळं सुरू असताना अरूंधती तिथं येते म्हणते, संजना अजूनही हे घर हातातून गेलेले नाही असं म्हणत ..यावर लगेच अनिरूद्ध देखील तेथे येतो ओ नेहमीप्रमाणे तो अरूंधतीवर ओरडतो...म्हणतो बस. यावर अरूंधती म्हणते अनिरूद्ध आवाज खाली..माझ्यावर ओरडायला मी तुमची बायको नाही..असं ठणकावून सांगताना दिसतेय.. आता यापुढे काय होणार हे येणाऱ्या भागातच समजणार आहे.
    View this post on Instagram

    A post shared by Star Pravah (@star_pravah)

    अरूंधतीचं हे रूप प्रेक्षकांना खूप दिवसांपासून पाहायचं होतं. आज तिचं हे रूप पाहून नेटकरी देखील खूश झाले आहे. तू मस्तच केलं आहेस...अशा कमेट करत नेटकऱ्यांनी अरूंधतीला पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर या प्रमोची चांगलीच चर्चा रंगली आहे. वाचा : `सॅक्रेड गेम्स`मधील `या` अभिनेत्रीचा इंटिमेट सीनवर धक्कादायक खुलासा अविनाशची कर्जाची नड भागविण्यासाठी अरुंधतीने यशच्या मदतीने व आप्पांच्या कानावर घालून राहतं घरं गहाण ठेवलंय. समृद्दीमधील तिचा हिस्सा तारण ठेवत पैसा उभा केला आणि अविनाशला मरणयातना भोगण्यापासून वाचवलं आहे.सुरुवातीला याबाबत कुणालाच माहिती नव्हती. ते फक्त यश, आप्पा आणि अरुंधती यांनाच हे माहिती होते. यश जेव्हा गौरीला हे सांगत होता तेव्हा संजनाने हे ऐकले. त्यानंतर तिने याचा उपयोग करत देशमुखांच्या घरात यांचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता सर्वांच्या मनात अरुंधतीबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वाचा: स्टार प्रवाहच्या 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत या अभिनेत्याची होणार एण्ट्री यामुळे सध्या देशमुख कुटुंबात नवं वादळ उभं राहिलं आहे. या संकटात आप्पा जरी अरुंधतीला साथ देत असले. तरीदेखील घरातील अन्य सदस्य अरुंधतीवर नाराज आहेत.दरम्यान, संजना आणि अनिरुद्ध त्यांच्या वाट्याला आलेला हिस्सा विकणार असून ते दोघंही देशमुख बंगल्यातून बाहेर पडणार आहेत. मात्र या सगळ्या संकटाचा अरूंधती कसा सामना करणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठऱणार आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published: