मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aai Kuthe Kay Karte : अनिरूद्धच्या एका निर्णयामुळे देशमुखांच्या घराचे होणार दोन भाग?

Aai Kuthe Kay Karte : अनिरूद्धच्या एका निर्णयामुळे देशमुखांच्या घराचे होणार दोन भाग?

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte Latest Episode) मालिकेत नवीन ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. अनिरूद्धने घऱाचा वरचा मजवा विकण्याचा निर्णय घेतला आहे.

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte Latest Episode) मालिकेत नवीन ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. अनिरूद्धने घऱाचा वरचा मजवा विकण्याचा निर्णय घेतला आहे.

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte Latest Episode) मालिकेत नवीन ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. अनिरूद्धने घऱाचा वरचा मजवा विकण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 26 ऑक्टोबर : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिकापैकी एक मालिका आहे. मालिकेत दररोज नवीन ट्वीस्ट ' (Aai Kuthe Kay Karte Latest Episode) पाहायला मिळतात. अविनाशची कर्जाची नड भागविण्यासाठी अरुंधतीने यशच्या मदतीने व आप्पांच्या कानावर घालून राहतं घरं गहाण ठेवलंय. अरूंधतीच्या एक निर्णयामुळे घरातील वातावरण बदलेले आहे. आता यातून पर्याय म्हणून अनिरूद्ध मोठा निर्णय घेणार आहे. घर विकण्याच्या निर्णयावर तो ठाम झाला आहे.

स्टार प्रवाहवर नुकताच एक प्रोमो प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये अनिरूद्ध त्याचा हिस्सा  घराचा एक भाग विकणार आहे. त्याचा हा निर्णय जेव्हा घरातील सगळ्यांना सांगतो तेव्हा सर्व वातावरण बदलून जाते. मात्र तो त्याच्या निर्णयावर ठाम आहे असल्याचे सांगता आहे. अनिरूद्धने घराचा वरचा मजला विकणार आहे. यावर केदार देखील त्याला म्हणतो अरे आता तू घराचे दोन भाग करणार आहेस काय..तर अनिरूद्ध देखील लगेच हो म्हणतो. म्हणतो मला आई आप्पांच्यासोबत राहायचे होते मात्र त्यांना माझी गरज नाही असं सागंताना दिसत आहे. यावर आई आप्पा त्याला समजवाताना दिसत आहेत. मात्र अनिरूद्धच्या या एका निर्णयामुळे देशमुख कुटुंबाच्या घराचे  म्हणजे समृद्धीचे  दोन भाग होणार का ... घराचा हा भाग नेमका कोण घेणार ...या सगळ्या प्रश्नाची उत्तर येणाऱ्या भागात मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अविनाशची कर्जाची नड भागविण्यासाठी अरुंधतीने यशच्या मदतीने व आप्पांच्या कानावर घालून राहतं घरं गहाण ठेवलंय. समृद्दीमधील तिचा हिस्सा तारण ठेवत पैसा उभा केला आणि अविनाशला मरणयातना भोगण्यापासून वाचवलं आहे.सुरुवातीला याबाबत कुणालाच माहिती नव्हती. ते फक्त यश, आप्पा आणि अरुंधती यांनाच हे माहिती होते. यश जेव्हा गौरीला हे सांगत होता तेव्हा संजनाने हे ऐकले.

वाचा : वर्षा उसगांवकर धरणार ममता बॅनर्जींचा हात, गोव्यात करणार पक्षप्रवेश- सूत्र

त्यानंतर तिने याचा उपयोग करत देशमुखांच्या घरात यांचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता सर्वांच्या मनात अरुंधतीबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातच अनिरूद्धच्या घर विकण्याच्या निर्णयामुळे समृद्धीचे दोन भाग होणार का..या सगळ्याचा देशमुख कुटुंब, अरूंधती कसा सामन करणार हे पाहावे लागेल. अरूंधती पैशाची व्यवस्था करून अनिरूद्धचा निर्णय बदलेल का ..अशा अनेक प्रश्न आता प्रेक्षकांना सतावत आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, Tv serial