मुंबई, 07 मार्च : सर्वत्र धुळीवंदनाचा उत्साह सुरू आहे. मालिकेतही कलाकार सेटवर होळी खेळत आहेत. अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. आई कुठे काय करते मालिकेत सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. त्यामुळे मालिकेतील होळी भाग काही दिवसांनी पाहायला मिळणार आहेत. सध्या अरुंधती आणि आशुतोष यांचा लग्नाचा उत्साह पाहायला मिळतोय. पण नुकताच एक फोटो समोर आला आहे ज्यात आता थेट अरुंधतीनंतर ईशाचं लग्न होणार आहे असं दिसत आहे. ईशानं म्हणजे अभिनेत्री अपूर्वा गोरेनं एक फोटो शेअर केलाय ज्याने सगळेच अवाक झाले आहेत.
आई कुठे काय करते मालिकेत सध्या अरुंधतीच्या लग्नासाठी सगळे तयार झालेत. अगदी कांचन देखील लग्नासाठी होकार देते. अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नात कांचन देखील सहभागी होत असल्यानं सगळेच आनंदी आहेत. त्याचप्रमाणे एकीकडे अरुंधती आणि ईशामध्ये भावनिक संवाद होतो. अरुंधती तिच्या निर्णयाबद्दल आणि आपल्या मुलांवर तिचं किती प्रेम आहे याबद्दल ईशाबरोबर बोलत असते. तर ईशा देखील तिला, 'माझं चुकलं मी तुला समजून घेऊ शकले नाही', असं म्हणते. तसंच 'अनिशनं मला समजावलं नाही तर मी तुझ्या लग्नासाठी कधीच तयार झाले नसते', असं सांगते. ईशाच्या तोंडातून अनिशबद्दल कौतुक ऐकून अरुंधती तिला 'तुला अनिश आवडतो का?' असं विचारते. त्यावर ईशा तिला 'हो' म्हणून उत्तर देते.
हेही वाचा - संजना अनिरूद्ध रंगून गेले प्रेमात, देशमुख आणि केळकर कुटुंबाने एकत्र येत साजरी केली रंगपंचमी
View this post on Instagram
मालिकेत ईशा आणि अरुंधतीच्या या संवादानंतर आता अरुंधती ईशा आणि अनिश यांच्या लग्नासाठी काही प्रयत्न करणार का? दोघांचं लग्न होणार का? असे प्रश्न सर्वांना पडले आहेत.अशातच ईशा म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरेच्या फॅन पेजवरून धुलिवंदनाच्या शुभेच्छा देत तिचा फोटो शेअर केला आहे. ज्यात तिनं साडी नेसली असून तिचा चेहरा रंगानं माखला आहे. तसंच तिच्या गळ्यात मंगळसूत्र देखील दिसत आहे. अरुंधतीनंतर आता ईशाचं देखील लग्न होणार का? असा प्रश्न हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांना पडला आहे.
अभिनेत्री अपूर्वा गोरेला आई कुठे काय करते मालिकेत प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. ईशा हे पात्र अल्पावधीतच प्रसिद्ध झालं. अपूर्वाचं इंजिनिअरींग झालं आहे. या आधी अपूर्वानं अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. सोनी मराठी ती फुलराणी मालिकेत गुड्डीची भूमिका साकारली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial