मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Abhishek Deshmukh : 'आई कुठे काय करते' मालिकेतील यश दहावीनंतर त्याचं घर सोडून...; स्ट्रगल स्टोरी आली समोर

Abhishek Deshmukh : 'आई कुठे काय करते' मालिकेतील यश दहावीनंतर त्याचं घर सोडून...; स्ट्रगल स्टोरी आली समोर

अभिषेक देशमुख

अभिषेक देशमुख

आई कुठे काय करते मालिकेतील यश दहावीतच त्याचं घर सोडून मुंबईत आला होता. वाचा त्याची स्ट्रगल स्टोरी

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  27 सप्टेंबर : मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे.  अनेक जण आपलं शहर सोडून या मायानगरीत येतात. सिनेसृष्टीत काम करणारे अनेक कलाकारही आपलं मुळ गाव सोडून मुंबईत आले घरापासून दूर राहिले. असाच घरापासून दूर राहिलेला अभिनेता सांगतोय त्याचा प्रवास. तो अभिनेता आहे अभिषेक देशमुख. अभिषेक म्हणजेच सध्या आई कुठे काय करते मालिकेतील यश. अभिषेक या शहरात आला होता अभिनय करण्यासाठी नाही तर शिक्षणासाठी. या मायानगरीतील त्याचे अनुभव त्यानं आज  शेअर केलेत.

अभिषेक सध्या साकारत असलेला यश देशमुख प्रेक्षकांना प्रचंड आवडतोय. या आधी अभिषेकनं 'पसंत आई मुलगी' या मालिकेत प्रमुख नायकाची 'पुनर्वसु'ची भूमिका केली होती. पुनर्वसु प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.  पसंत आहे मुलगी ही अभिषेकची पहिली मालिका होता. त्यानंतर तो लहान मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसला. अभिनय क्षेत्रात येण्याआधी अभिषेक मुंबईत आला तो म्हणजे दहावीची परीक्षा दिल्यानंतर. त्याचा संपूर्ण प्रवास सांगत त्यानं पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा - Aai Kuthe Kay karte : आई कुठे काय करते मालिकेचं नाव बदला; प्रेक्षकांचा सल्ला, तुम्हीही व्हाल शॉक

अभिषेकनं म्हटलंय, '2004 साली 10 वी नंतर मी घराबाहेर पडलो. पुण्यात आलो. माझे जळगावचे मित्र माझ्याबरोबर होते. 2007 पासून पुढची 5 वर्ष आर्कीटेक्चरसाठी मुंबईत होस्टेलला राहीलो पण  घरापासून दूर मी एकटाच नव्हतो माझे अनेक मित्र वेगवेगळ्या गावातून,शहरातून,राज्यातून आले होते. रात्रभर जागून केलेले सबमिशन्स, भाऊचा धक्का, डॅाकयार्ड, गोराईचा पॅगोडा, सोबो, बॅंडस्टॅंड, काला घोडा फेस्ट अशा अनेक साईट विजीट्स होत्या.

अभिषेकनं पुढे लिहिलंय,  शहर पालथं घातलं. हे शहरच घर झालं. मी घरापासून दूर असताना काही मित्रांनी त्यांच्या घरात सामावून घेतलं. वांन्द्रे-कलानगरचा सपाट वेस्टर्न हायवे बघून जळगावच्या घराची आठवण यायची आणि पोटात खड्डा पडायचा.  घरापासून दूर राहील्यावर घराची किंमत कळतेच पण माणसं शिक्षक मित्र मनात कायमस्वरुपी घर करून राहतात हे लक्षात आलं.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news