Home /News /entertainment /

लाट बाई लाट पोळ्या लाट..! संजनाला स्वयंपाक येत नाही पण रूपालीला येतो, विश्वास नसेल तर हा VIDEO एकदा पाहाच

लाट बाई लाट पोळ्या लाट..! संजनाला स्वयंपाक येत नाही पण रूपालीला येतो, विश्वास नसेल तर हा VIDEO एकदा पाहाच

आई कुठे काय करते मालिकेत संजनाला स्वयंपाकाचा साधा स सुद्धा येत नाही पण खऱ्या आयुष्यात मात्र ती मस्त स्वयंपाक करते. शिवाय तिचं पोळी लाटण्याचे स्पीड तर जबरदस्त आहे. विश्वास बसत नसेल तर रूपाली भोसलेचा हा व्हिडिओ एकदा पाहा.

  मुंबई, 21 मे- आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte ) मालिका सततच्या ट्वीस्टमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे. या मालिकेतील कलाकारांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मालिकेत संजनाती भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले (rupali bhosle)  साकारताना दिसते. रूपालीची भूमिका नकारात्मक असली तरी सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकताच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये मालिकेत स्वयंपाकाचा साधा स सुद्धा येत नसलेली संजना खऱ्या आयुष्यात मात्र मस्त स्वयंपाक करते. शिवाय तिचं पोळी लाटण्याचे स्पीड तर जबरदस्त आहे. विश्वास बसत नसेल तर रूपाली भोसलेचा हा व्हिडिओ एकदा पाहा. रूपाली भोसलेने इन्स्टावर एक व्हिड़िओ शेअर केला आहे. यामध्ये ती स्वयंपाक म्हणजे पोळ्या करताना दिसत आहे. तिचं पोळ्या लाटण्याचे स्पीड देखील जबर आहे. शिवाय तिनं पोळ्याच नाही तर भाजीपासून सगळा स्वयंपाक केला आहे. रूपालील असं स्वयंपाक करातना पाहून अनेकांना विश्वासच बसलेला नाही. एका चाहत्याने कमेंट करत स्वयंपाक येतो...असं म्हणत आश्चर्य व्यक्त केले आहे. तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, रूपाली मॅडम तुम्ही खूप छान पोळ्या करता, तशाच पोळ्या अनिरुद्ध देशमुखच्या घरात पण करा. तसा तुमच्या कॅरेक्टर मध्ये बदल करायला सांगू का ?????? म्हणजे तुमचा घटस्फोट होणार नाही 😀😂😂🙏🙏💕💕🙏🙏. वाचा-'केतकीच्या पोस्टमुळे पाटील मेला हे तरी कळलं', सदाभाऊ खोत पुन्हा बोलले रूपाली भोसलेना तिचा हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, 12/14 तासांच्या शूटिंगनंतर मला खूप खूप मनापासून स्वयंपाक करायला आवडत, तेच माझं स्ट्रेस बस्टर आहे. स्वयंपाक करायला मला खूप आवडतं. संजनाला स्वयंपाक येता नाही पण रुपालीला येता आणि मला यचा नक्कीच अभिमान आहे.
  आई कुठे काय करते मालिकेत संजना आजपर्यंत कधीच स्वयंपाक करताना दिसलेली नाही. मात्र खऱ्या आयुष्यात संजनाची भूमिका साकारणारी रूपाली भोसले उत्तम स्वयंपाक करते हे या व्हिडिओमध्ये दिसतच आहे. रूपाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध व्हिडिओ फोटो शेअर करत असते. तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे देखील ती नेहमीच चर्चेत असते.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या