हेही वाचा - 'आपलं मूळ, संस्कृती विसरतात ती माणसं म्हणजे मूळ नसलेली झाडं', दीपिकाच्या 'त्या' पोस्टची चर्चा अनुभव सांगताना मिलिंद गवळी पुढे म्हणाले, 'छान पाऊस सुरू झाला आहे, 'विठ्ठल विठ्ठल' सिनेमा मेकिंगच व्हिडीओ फुटेज मला मिळालं. सहा सात जुलै 2003 , आळंदी पासून शूटिंग करत करत पंढरपूर पर्यंत आम्ही चाललो होतो. मी एक साधू संन्याशाच्या वेशात पंढरपुरामध्ये बसलो होतो, शूटिंग सुरू व्हायला थोडा अवकाश होता आणि तीन चार बायका माझ्यासमोर येऊन बसल्या, एका वयस्कर बाईन माझ्या पायावर डोकं ठेवलं आणि मला म्हणाली 'बाबा माझ्या आयुष्याच सार्थक झालेला आहे, दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत, मुलगा रांके ला लागलेला आहे, आता बाबा तुम्ही मला आशीर्वाद द्या, म्हणजे मी शांतपणे डोळे मिटू शकेन' , मी त्या बाईंना म्हणालो 'आजी जात्या विठ्ठलाच्या पाया पड माझ्या नको, मी एक कलाकारे आणि हा साधू चा रोल करतोय'. त्या बाई म्हणाल्या 'नाही बाळा ,तूच मला आशीर्वाद दे ,कारण मला दिसतो ना विठ्ठल तुझ्या मध्ये'. 'कलाकारच आयुष्य किती वेगळ आणि सुंदर आहे बघा ,एका बाजूला अनिरुद्ध देशमुखला एक बाई चपलेने मारेन असं म्हणते आणि 'विठ्ठल विठ्ठल' या भूमिकेसाठी एका बाईला माझ्यामध्येच विठ्ठल दिसतो ,पांडुरंग दिसतो . विलक्षण नाही का हे सगळं !', असं मिलिंद गवळी म्हणाले. त्याचप्रमाणे 'गेली अडीच तीन वर्ष आई कुठे काय करते मधल्या अनिरुद्ध देशमुख माझ्या या भूमिकेला बायकांनी असंच शिव्या दिल्या आणि देत आहेत ,अजूनही देतायेत. अशावेळेला 'विठ्ठल विठ्ठल' या सिनेमातल्या भूमिके चा अनुभव खूप आवर्जून आठवतो, असही मिलिंद गवळी म्हणालेत. मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरली असून पोस्टची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. अनेकांनी कमेंट्स करत मिलिंद गवळींच्या या पोस्टचं कौतुक केलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment