मुंबई, 03 डिसेंबर : आई कुठे काय करते मालिकेतून पुन्हा एकदा घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका त्यांनी इतकी उत्तमरित्या साकारली आहे त्याला तोड नाही. मिलिंद गवळी सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. अनेक पोस्ट ते शेअर करत असतात. नुकतीच त्यानं मित्राच्या वाढदिवशी 25 वर्षापूर्वीची आठवण शेअर केली आहे. मैत्री कशी असावी आणि खरी मैत्री कशी टिकून राहते याचं उदाहरणच त्यांनी दिली आहे.
मिलिंद गवळी यांनी मित्राच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केली. त्यांचा मित्र म्हणजेच अभिनेता अतुल परचुरे. अतुल आणि मिलिंद यांनी एकत्र फार कमी काम केलं पण त्यांची मैत्री आजी कायम आहे. एकत्र काम केलं नसलं तरी त्यांच्या असलेलं नात त्यांनी आजही टिकून ठेवलं आहे. त्यामुळे मित्राच्या वाढदिवशी मिलिंद यांनी खास व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
हेही वाचा - Bigg Boss Marathi 4: 'तेजस्विनीला झालेली दुखापत साधी सुधी नाही'; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
View this post on Instagram
मिलिंग यांनी लिहिलंय, 'सुन लाडकी सासरची' १९९७ मध्ये पुण्याच्या ग्वालियर पॅलेस मध्ये या मराठी चित्रपटाचे शूटिंग झालं, जवळजवळ अडीच तीन महिने आम्ही त्या पॅलेस मध्ये राहत होतो आणि तिथेच दिवसभर शूटिंग पण करत होतो. तिथे एका हरहुन्नरी कलाकाराची ओळख झाली. पु ल देशपांडे यांचा सुद्धा तो लाडका होता, त्यांचा आवडता कलाकार होता. त्यांचं 'व्यक्ती आणि वल्ली' नाटक करायची त्याला अनुमती पु.लं. ने दिली होती. तो म्हणजे आमचा अतुल परचुरे, ज्याला मी प्रेमाने 'अतुलनीय' असा म्हणतो'.
मिलिंद आणि अतुल या सिनेमाच्या शुटींगनिमित्त 3 महिने एकत्र होते. दोघांची तिथे चांगली मैत्री झाली. मिलिंद यांनी पुढे लिहिलंय, 'आपण एका सुपर टॅलेंटेड कलाकाराबरोबर काम करतो आहेत असं मला त्यावेळी सुद्धा वाटायचं. अतुल ला घेऊन एखादा सिनेमा काढायची त्या वेळी माझी फार इच्छा होती आणि ती अजून ही आहे. १९९७ ते अत्ता २०२२ जवळजवळ पंचवीस वर्ष आम्ही परत एकत्र कामच केलं नाही. पण आमची मैत्री आजही खूप घट्ट आहे. काल अतुलचा वाढदिवस होता म्हणून त्याला सकाळी शुभेच्छा दिल्या आणि मग अतुलच्या बरोबर घालवलेल्या जुन्या आठवणींमध्ये रमून गेलो'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.