मुंबई, 29 मार्च- आई कुठे काय करते मालिका छोट्या पडद्यावरली लोकप्रिय मालिका आहे. मालिकेचं कथानक अरुंधती भोवती फिरताना दिसते. मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर साकारताना दिसते. मालिकेत ती आईच्या भूमिकेत दिसते. आई म्हणून तिची आता एक ओळख बनली आहे. मधुराणी खऱ्या आयुष्यात देखील एका मुलीची आई आहे. अनेकदा ती लेकीसोबतचे धमाल व्हिडिओ शेअर करताना दिसते. आता देखील तिनं लेकीसोबत भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे.
मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. कधी किवता सादरीकरणाचे तर कधी लेकीसोबत गायनाचे व्हिडिओ ती शेअर करताना दिसते. मधुराणीच्या लेकीचं नाव स्वरा आहे. स्वरासोबत तीनं एक रील सादर केलं आहे. या रीलला एक भन्नाट कॅप्शन देखील तिनं दिल आहे. तिनं म्हटलं आहे की, लगी जेव्हा आई होते....असं म्हणत या दोघीं एका इंग्रजी गाण्यावर रील सादर करत आहेत. चाहत्यांना देखील माय लेकीची धमाल रील प्रचंड आवडलेली आहे. शिवाय अनेकांनी कमेंट करत या माय लेकीचं कौतुक देखील केलं आहे.
वाचा-'तुझ्याशिवाय जगण्याला काहीच अर्थ नाही..' श्रेया बुगडेची अभिनेत्यासाठी पोस्ट
एका चाहत्याने म्हटलं आहे की, मला ती कविता आठवली, "तू आहेस लेक आणि मी तुझी आई, बरं का गं आई हे विसरायचं नाही" अशा काहीशा ओळी आहेत त्या कवितेच्या....तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की,अरे बापरे😂 ..अशा असंख्य कमेंट या रीलवर आल्या आहेत.
View this post on Instagram
सोशल मीडियावर सक्रीय असलेली मधुराणी अनेकदा तिच्या लेकीसोबतचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यापूर्वी देखील तिने तिच्या मुलीसोबत गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये या दोघींची गाण्याची जुगलबंदी पाहायला मिळाली होती.मधुराणी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती उत्तम कवित सादर करते हे चाहत्यांना माहित असेलच. ती अनेकवेळा तिच्या कविता सदीकरणाच्या कार्यक्रमाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्य़ांनसोबत शेअर करत असते. शिवाय ती उत्तम गाते देखील, तिला गायनाची देखील आवड आहे. म्हणून तिनं तिच्या मुलीचं नाव स्वराली ठेवलं आहे.
आई कुठे काय करते मालिका सध्या एका विशिष्ट वळणावर आहे. अरुंधीतचं आता दुसरं लग्न झालं आहे. आशुतोषसोबत तिनं आयुष्याला नव्याने सुरूवात केली आहे. अनिरूद्धपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय ते आजपर्यंतच्या प्रवासात आशुतोष नेहमीच तिच्या सोबत उभा राहिला आहे. देशमुखाचं घर सोडलं होतं तेव्हा देखील आशुतोष तिच्या मदतीला आला होता. आता तो तिचा फक्त मित्र नाही तर नवरा देखील आहे. त्यामुळं या दोघांच्यातील नातं आणखी काहीसं घट्ट झालं आहे. या दोघांच्या आयुष्यात आता पुढे काय घडणार याची देखील चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment