Home /News /entertainment /

'17 वर्षांनी मी वर्षा उसगावकर यांना बघतो आहे, अजूनही त्या तशाच..ग्रेसफुल' मिलिंद गवळींनी शेअर केली खास आठवण

'17 वर्षांनी मी वर्षा उसगावकर यांना बघतो आहे, अजूनही त्या तशाच..ग्रेसफुल' मिलिंद गवळींनी शेअर केली खास आठवण

मिलिंद गवळी यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अभिनेत्री वर्षा उसगावकर (varsha usgaonkar) यांच्याशीसंबंधी आहे.

  मुंबई, 22 मे- छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte ) ही मालिका लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांवर प्रेक्षक अगदी मनापासून प्रेम करताना दिसतात. दिवसेंदिवस या कलाकारांची लोकप्रियता ही वाढतच चालली आहे. मालिका जरी अरुंधतीभोवती फिरत असली तर अनिरुद्ध, संजना या नकारत्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या अभिनयाचे तितकेच कौतुक होत असतं. मालिकेत अनिरुद्धची भूमिका मिलिंद गवळी साकारताना दिसतात. या भूमिकेमुळे मिलिंद यांना वेगळी ओळख व लोकप्रियता दिली. मिलिंद गवळी ( Milind Gawali ) नेहमीच सोशल मीडियावर मालिकेबद्दल असेल किंवा त्यांच्या भूमिकेबद्दल मत मांडत असतात. मिलिंद गवळी यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अभिनेत्री वर्षा उसगावकर (varsha usgaonkar) यांच्याशीसंबंधी आहे. काही फोटो शेअर करत त्यांनी वर्षा उसगावकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनेत्री वर्षा उसगावकर सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत मायींची भूमिका साकारताना दिसतात. मिलिंद गवळी आणि वर्षा उसगावकर यांची नुकतीच प्रवाह पिक्चर च्या मुहूर्ताच्या निमित्ताने भेट झाली. यानिमित्त त्यांनी वर्षा उसगावकर यांच्यासोबतच्या काही जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी वर्षा उसगावकर यांच्यासोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. वाचा-महाराष्ट्राचा मान वाढवत आदिनाथने थेट कान्समध्ये फडकवला मराठी झेंडा मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ''प्रवाह पिक्चरच्या मुहूर्ताच्या प्रसंगी त्या सोहळ्याच्या वेळेला अनेक दिग्गज कलाकारांच्या भेटी झाल्या या सगळ्या महान कलाकारांबरोबर मला काम करायचं भाग्य मिळालं होतं अशा प्रसंगी त्यांच्या भेटीगाठी होतात याचा फार मला आनंद होतो ,नाही तर एकदा एका कलाकाराबरोबर आपण काम केलं , तो चित्रपट किंवा ती सीरियल पूर्ण झाली की त्यानंतर किती वर्षांनी आमची भेट होईल याची काही शाश्वती नसते, सुलेखा तळवलकर बरोबर जेव्हा “ आई “चित्रपट केला नंतर जवळजवळ 22 वर्षानंतर आम्ही एकत्र “तु अशी जवळी रहा “ ही मालिका केली. अर्चना पाटकर “सुन लाडकी सासरची “मध्ये माझी आई होत्या,आता पंचवीस एक वर्षानंतर “आई कुठे काय करते “ या मालिकेत एकत्र काम करतोय. '' वाचा-तेजश्री प्रधानला मिळाली नवी मालिका, दिसणार नव्या भूमिकेत ''असे अनेक कलाकारांबरोबर वर्ष-वर्ष भेटी होत नाहीत काल वर्षाताईं बरोबर स्टार प्रवाह च्या event मध्ये माझा आणि त्यांचा फोटोशूट झाला, फोटो शूट करत असताना आठवलं की की 2006 मध्ये आम्ही एकत्र @maheshtilekar यांच एक गाणं केलं होतं , त्यानंतर आम्ही सोळा सतरा वर्षे एकत्र कामच केलं नाही.''
  ''मी selfie काढला लगेच, कारण परत किती वर्षांनी आम्ही भेटू माहित नाही. पण 16/ 17 वर्ष मी वर्षातईंना बघतो आहे त्या तशाच आहेत . Very Graceful. त्यांना खूप खूप शुभेच्छा...'' अशा शब्दात मिलिंद गवळी यांनी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या सौंदर्याचे तर कौतुक केलेच आहे, शिवाय जुन्या आठवणींना उजाला देण्याचा प्रयत्न केला आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या