मुंबई, 23 मे- आई कुठे काय करते( Aai kuthe kay karte ) मालिका सततच्या टवीस्टमुळे नेहमी चर्चे असते. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित ही मालिका असून अरुंधती या पात्राभोवती मालिकेचं संपूर्ण कथानक फिरताना दिसतं. या मालिकेतील अरुंधतील ही भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर (Madhurani gokhale prabhulkar ) साकारत असून तिच्या अभिनयामुळे अनेकांची मनं जिकंली आहेत. या मालिकेमुळे मधुराणीला एक वेगळी ओळख मिळाली. मधुराणी हे नाव महाराष्ट्राच्या घराघारत पोहचलं. मधुराणी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते. मधुराणीनं नुकताच (Madhurani prabhulkar latest Video) तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होता आहे.
मधुराणी प्रभुलकरनं नुकताच आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवरचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मधुराणीचा रोमॅंटिक अंदाज चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे. सोबतच्या तिच्या मागे 'फिर छिड़ी रात बात फूलों की...' ही गझल देखील वाजत आहे. तिच्या अदा आणि सोबत गझल असा काहीसा मधुराणीचा रोमॅंटिक अंदाज पाहून चाहते मात्र खूश झाले आहेत. चाहत्यांकडून तिच्या या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
वाचा-तेजस्विनी पंडितच्या बोल्ड भूमिकेवरून सोशल मीडियावर 'रानबाजार' उठवणं कितपत योग्य?
मधुराणी प्रभुलकर अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम कवयित्री आणि गायिका व संगीतकार सुद्धा आहे. आहे. अनेकदा ती तिच्या कविता तिच्या आवाजात सोशल मीडियावर शेअर करत असते. मधुराणीला संगीतकार म्हणून सुंदर माझं घर चित्रपटात पहिला मोठा ब्रेक मिळाला. ज्यासाठी साधना सरगम आणि श्रेया घोषाल यासारख्या अव्वल गायिका यात सहभागी झाल्या होत्या.
आई कुठे काय करते मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर आहे. अरुंधतीला आशुतोषवर असण्याची प्रेमाची जाणीव झाली आहे. मात्र असं जरी असलं तरी अनिरुद्ध मात्र अरुंधतीच्या विरोधात अभिचा वापर करताना दिसत आहे. यामुळे भविष्यात अरुंधती आणि आशुतोष यांच्या नात्यात अभि अडथळा ठरू शकतो असेच काहीसे चित्र दिसत आहे.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.