Home /News /entertainment /

'नाव गाव माहीत नसताना ही तुझे...' मधुराणी प्रभुलकरच्या आवाजातील सुंदर कविता ऐकून पडाल 'अनंता'च्या फुलाच्या प्रेमात

'नाव गाव माहीत नसताना ही तुझे...' मधुराणी प्रभुलकरच्या आवाजातील सुंदर कविता ऐकून पडाल 'अनंता'च्या फुलाच्या प्रेमात

मधुराणी प्रभुलकरने आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवरून एक अनंताच्या फुलाचा किस्सा शेअर करत ज्येष्ठ कवी द. भा धामणस्कर यांची एक सुंदर कविता चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

    मुंबई, 25 मे- आई कुठे काय करते( Aai kuthe kay karte ) मालिका सततच्या ट्वीस्टमुळे नेहमी चर्चे असते. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित ही मालिका अरुंधती या पात्राभोवती फिरताना दिसते. या मालिकेतील अरुंधतील ही भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर (Madhurani gokhale prabhulkar ) साकारत असून तिच्या अभिनयानं तिनं अनेकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेमुळे मधुराणीला एक वेगळी ओळख मिळाली. मधुराणी हे नाव महाराष्ट्राच्या घराघारत पोहचलं. मधुराणी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते. तिला कविता वाचनाची देखील आवड आहे हे खूप कमी लोकांना माहिती असेल. तिनं नुकताच सेटवरून एक फुलाचा किस्सा शेअर करत ज्येष्ठ कवी द. भा धामणस्कर यांची एक सुंदर कविता चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मधुराणी इन्स्टाला सेटवरील अनंताच्या फुलाचा एक किस्सा शेअर करत एक सुंदर कविता देखील शेअर केली आहे. तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आमच्या सेटवर अनंताचं झाड आहे...काल रियासतने ( सेटवरर=चा माझा काळजीवाहू ) मला हे फूल आणून दिलं.... माझा जीव आंनदला. कारण फुलं म्हणजे माझा अगदी जीव.... आणि तितक्याच नाजूक अशा फुलांवरच्या कविताही... ज्येष्ठ कवी द. भा धामणस्कर ह्यांची अशीच एक तरल कविता खास तुमच्यासाठी ( headphones recommended ).... ''तुझ्या केसात अनंताचे फुल आहे, म्हणजे तुझ्या अंगणात अनंताचे झाड आहे, या जाणिवेने मी मोहरुन जातो, नाव गाव माहीत नसताना ही तुझे, आपल्यात एक तरल संबंध रुजू पाहतो…'' ज्येष्ठ कवी द. भा धामणस्कर यांची कविता मधुराणीनं तिच्या सुंदर आवाजात चाहत्यांसाठी खास शेअर केली आहे. चाहत्यांकडून मधुराणीच्या या पोस्टवर कमेंटचा वर्षाव होत आहे. अनेकांनी तिच्या आवाजाचं कौतुक केलं आहे.
    मधुराणी प्रभुलकर अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम कवयित्री आणि गायिका व संगीतकार सुद्धा आहे. आहे. अनेकदा ती तिच्या कविता तिच्या आवाजात सोशल मीडियावर शेअर करत असते. मधुराणीला संगीतकार म्हणून सुंदर माझं घर चित्रपटात पहिला मोठा ब्रेक मिळाला. ज्यासाठी साधना सरगम आणि श्रेया घोषाल यासारख्या अव्वल गायिका यात सहभागी झाल्या होत्या. वाचा-'त्याग पाहून टचकन डोळ्यात पाणी आलं' अमृताच्या 'त्या' पोस्टवर चाहत्याची कमेंट मधुराणी प्रभुलकरची कविता वाचनाची आवड कुणापासून लपलेली नाही. अनेकादा सोशल मीडियावर यासंबंधी व्हिडिओ शेअर करत असते. नुकतीच मधुराणीनं इंदौर वारी केली. इंदौरमध्ये तिनं कविता वाचनांचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमाला इंदौरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या