Home /News /entertainment /

'मन शांती हे सर्वोत्तम लक्ष....' मधुराणी प्रभुलकरच्या कॅप्शनपेक्षा गालावरच्या खळीची चर्चा जास्त!

'मन शांती हे सर्वोत्तम लक्ष....' मधुराणी प्रभुलकरच्या कॅप्शनपेक्षा गालावरच्या खळीची चर्चा जास्त!

Aai kuthe kay karte : मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते. मधुराणीनं नुकताच (Madhurani prabhulkar latest post ) तिचा एक फोटो शेअर करत एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

  मुंबई, 19 मे- आई कुठे काय करते( Aai kuthe kay karte ) मालिका सततच्या टवीस्टमुळे नेहमी चर्चे असते. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित ही मालिका असून अरुंधती या पात्राभोवती मालिकेचं संपूर्ण कथानक फिरताना दिसतं. या मालिकेतील अरुंधतील ही भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर (Madhurani gokhale prabhulkar ) साकारत असून तिच्या अभिनयामुळे अनेकांची मनं जिकंली आहेत. या मालिकेमुळे मधुराणीला एक वेगळी ओळख मिळाली. मधुराणी हे नाव महाराष्ट्राच्या घराघारत पोहचलं. मधुराणी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते. मधुराणीनं नुकताच (Madhurani prabhulkar latest post ) तिचा एक फोटो शेअर करत एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. अनेक जण तिच्या पोस्टचं कौतुक करत आहेत मात्र तितकेच तिच्या गालवरच्या खळीच्या प्रेमात पडल्याचे दिसत आहेत. मधुराणीनं तिच्या इन्स्टाला एक तिचा विदाऊट मेकअप असा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्या गालवरची खळी सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. शिवाय तिनं या फोटोला सुंदर कॅप्शन देखील दिली आहे. तिनं म्हटलं आहे की, मन शांती हे सर्वोत्तम लक्ष मानून सगळ्या गोष्टी करा आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. चाहत्यांनी मधुराणीच्या लुकचं कौतुक करत कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजीचा पाऊस पाडला आहे. वाचा-Anand Remake: राजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांच्या आयकॉनिक चित्रपटाचा बनणार रिमेक मधुराणी प्रभुलकर अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम कवयित्री आणि गायिका व संगीतकार सुद्धा आहे. आहे. अनेकदा ती तिच्या कविता तिच्या आवाजात सोशल मीडियावर शेअर करत असते. मधुराणीला संगीतकार म्हणून सुंदर माझं घर चित्रपटात पहिला मोठा ब्रेक मिळाला. ज्यासाठी साधना सरगम आणि श्रेया घोषाल यासारख्या अव्वल गायिका यात सहभागी झाल्या होत्या.
  मधुराणी प्रभुलकरची कविता वाचनाची आवड कुणापासून लपलेली नाही. अनेकादा सोशल मीडियावर यासंबंधी व्हिडिओ शेअर करत असते. नुकतीच मधुराणीनं इंदौर वारी केली. इंदौरमध्ये तिनं कविता वाचनांचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमाला इंदौरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या