मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'आई कुठे काय करते'मधील जुना Video पाहून अरुंधतीला आलं भरून, पोस्ट लिहित मानले सर्वांचे आभार

'आई कुठे काय करते'मधील जुना Video पाहून अरुंधतीला आलं भरून, पोस्ट लिहित मानले सर्वांचे आभार

छोट्या पडद्यावरील मराठी मालिका 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karate) ने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेमुळे अरुंधतीला साकारत असलेल्या अभिनेत्री मधुराणी गोखले हिला एक नवी ओळख मिळाली.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 24 डिसेंबर- छोट्या पडद्यावरील मराठी मालिका 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karate) ने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आता या मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. मालिकेत सतत अरुंधतीला (Arundhati) आपल्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी लढावं लागतं. संजना अर्थातच तिच्या नवऱ्याची आधी प्रेयसी आणि आताची पत्नी प्रत्येक वेळी तिच्या स्वाभिमानाला तडा देण्याचा प्रयत्न करत असते. या दोघींनमधला हा संघर्षचं प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. या मालिकेमुळे अरुंधतीला साकारत असलेल्या अभिनेत्री मधुराणी गोखले हिला एक नवी ओळख मिळाली. आता मधुराणी गोखलेने या मालिकेतील एका जुना व्हिडिओ शेअर करत एक पोस्ट केली आहे. मधुराणी गोखलेची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. या पोस्टमध्ये तिनं सर्वांचे आभार मानले आहेत.

मधुराणीने मालिकेतील एका महत्त्वपूर्ण सीनचा जुना व्हिडीओ शेयर करत म्हटले आहे की, आपण आपल्या आयुष्यात कधीही न केलेली गोष्ट करून पाहतो ....आपल्या सोयीच्या परिघा बाहेर पडून काहीतरी नवीन शिकतो तेव्हा आपण आपल्याला खरे सापडायला लागतो.जशी ह्या छोट्या छोट्या पावलातून अरुंधतिला तिचं स्वत्व सापडत गेलं .

वाचा-बिग बॉसमुळे मीराला परत मिळाले प्रेम, शेतकरी वडिलांचा भावुक Video

इंस्टा वरच्या एका फॅनपेजनी आज हे share केलं आणि पुन्हा एकदा मला भरून आलं. आतून आतून कृतज्ञ वाटलं त्या प्रत्येकाविषयी ज्यांच्यामुळे मी ही भूमिका करू शकले...आणि करू शकतेय. आज वेगवेगळ्या स्तरातल्या मला अनेक स्त्रिया भेटतात. गृहिणी असतात , शिक्षिका असतात, ऑफिसर असतात , उद्योजिका असतात....वेगवेगळ्या वयाच्या , वेगवेगळ्या आर्थिक , सामाजिक स्तरातल्या.... पण त्यांच्या प्रत्येकीच्या डोळ्यात मला भेटून हलकं पाणी असतं.... प्रत्येकिला अरुंधती मध्ये ती सापडली असते....कुठल्या न कुठल्या टप्प्यावर तिनी अरुंधती कडून प्रेरणा घेतलेली असते... अरुंधतीनी तिला धीर दिलेला असतो , सावरलेलं, एक आशेचा किरण दाखवलेला असतो .. अगदी मी स्वतः सुद्धा ह्याला अपवाद नाहीये हं..!

आमची अतिशय गुणी आणि हुशार लेखिका नमिता वर्तक , संवाद लेखिका मुग्धा गोडबोले आणि संवेदनशील दिग्दर्शक रवींद्र करमरकर सर , मी तर आहेच पण अशा असंख्य स्त्रिया तुमच्या आभारी आहेत..आणि असतील. अशी पोस्ट तिनं लिहिली आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials