मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'तुझ्या आईला रडायला येतं आहे कारण...'; आई कुठे...' फेम देविकाची लेकीसाठी भावूक पोस्ट

'तुझ्या आईला रडायला येतं आहे कारण...'; आई कुठे...' फेम देविकाची लेकीसाठी भावूक पोस्ट

radhika deshpande

radhika deshpande

मुलांना शाळा संपल्या की आया खुश होतात पण ही अभिनेत्री मात्र भावुक झाली आहे. आई कुठे काय करते मालिकेतील ऑनस्क्रिन सिंगल असलेली देविका खऱ्या आयुष्यात मात्र एका मोठ्या मुलीची आई आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 मार्च :  मुलांची शाळा म्हटलं की धावपळ ही आलीच. विशेषकरून मुलांच्या आई तर झोपतच नाहीत. त्यांचं सगळं लक्ष मुलांच्या शाळेकडे लागलेलं असतं. आईचा जीव अडकलेला असतो तो  लेकरांमध्ये म्हणून तर आपल्या मुलांना शाळेत घालवणं देखील आईला जड जातं.त्याला कारणही तसंच आहे. तेवढा वेळ आपलं मुलं आपल्यापासून लांब राहणार याचीच भीती कुठल्याही आईला सतावत असतं. आता उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला आहे. मुलांच्या परीक्षा संपत आल्या असून सगळेच सुट्ट्यांवर जाण्याच्या तयारीत आहेत.  मुलांना शाळा संपल्या की आया खुश होतात पण ही अभिनेत्री मात्र भावुक झाली आहे.  आई कुठे काय करते मालिकेतील ऑनस्क्रिन सिंगल असलेली देविका खऱ्या आयुष्यात मात्र एका मोठ्या मुलीची आई आहे. ऐकून धक्का बसला का? पण हो हे खरंय अभिनेत्रीनं स्वत: लेकीबरोबरचा फोटो आणि खास पोस्ट शेअर केली आहे.

मालिकेतील देविका म्हणजेच अभिनेत्री राधिका देशपांडे अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात काम करतेय. अनेक नाटक, सिनेमा तसेच मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे. राधिकाला 16 वर्षांची मुलगी आहे. तिची नुकतीच 10वी परीक्ष झाली आहे. तिच्या शाळेचा शेवटचा दिवस पूर्ण झाला असून अभिनेत्रीनं लेकीच्या शाळेच्या शेटवच्या दिवशी खास पोस्ट लिहिली आहे.  राधिका लेकीला प्रेमानं बबुष्का म्हणते. तिनं लिहिलंय, प्रिय बबुष्का, आज तुझा शाळेतला शेवटचा दिवस. आणि मला रडायला येतं आहे. रोजच्या दिनचर्येतलं एक काम म्हणजे वळणदार छानशी वेणी घाळणे. "आईईई वेणी घालून दे" "अंतरा फणी जागेवर ठेवत जा गं" "आई चल पटकन किती वेळ लावते आहेस"  थांब ग जरा, हलू नकोस, वेणी नीट येत नाही मग"

हेही वाचा - मालिकेच्या सेटवर सूर जुळले अन् बांधली लग्नगाठ; 2 वर्षांनी हलला पाळणा,आता अभिनेत्याच्या लेकीच्या बारशाचा थाटचं न्यारा

शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलीनं दोन वेण्या या कधीना कधी घातल्याचं असतील. आई आणि मुलीचा वेणी फणी करतानाचा खास संवाद देखील प्रत्येक मुलीसाठी खास असतो.  त्याविषयी राधिकानं लिहिलं आहे की, "तीन पदरी वेणीत वात्सल्य, परंपरा, शिस्त गुंफत आले आहे मी आजवर. शेवटची पेड गुंफते आहे. त्याला रबर बैंड लावते आहे. स्वच्छ फणी, घट्ट वेणी, वर्षानुवर्ष वेळेत घातलेली, कधी आवडती, कधी नावडती वेणी. हे सगळं आज थांबणार".

पण आता लेकीची शाळा बंद होणार म्हटल्यावर रोजचा सवयींचा एक भाग सुटणार आहे. आता रोज वेण्या घालाव्या लागणार नाही. अभिनेत्री यामुळे भावुक झाली आहे. राधिकानं लिहिलंय, "एक वळण मला दिसतंय अंतरा. उद्यापासून शाळा नाही. आपला संवाद नाही. वेणी नाही का फणी नाही. तुझ्या आईला रडायला येतं आहे कारण वळण आलं आहे. गाडी सुटल्या सारखं वाटतंय, डबा हरवल्यासारखा वाटतो आहे... पण...पण मी रडले नाही. चेहऱ्याकडे बघ माझ्या दिसते आहे मी रडल्यासारखी? आईनं मुलगी शाळेत जाताना चेहरा हसराच ठेवायचा असतो. नियमच आहे तसा."

राधिकानं शेवटी लिहिलंय, "हे सगळं मी तुला बोलून दाखवलं नाही. पण तुला ते कळलं असणार. केसांवरून फिरवलेल्या फणीनं ते सांगितलं असणार. बाकी आजची वेणी वळणदार होती ह्यात शंकाच नाही. अंतरा तू शाळेत वेळेत पोहोचली! मुलगी शिकली. मुलगी मोठी झाली. आई मात्र लहानच राहिली... असो. तुझी... तुझीच, आई".

First published:
top videos

    Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial