Home /News /entertainment /

तर मी डिप्रेशनमध्ये गेले असते... 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक अनुभव

तर मी डिप्रेशनमध्ये गेले असते... 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक अनुभव

आई कुठे काय करते ( aai kuthe kay karte ) मालिकेतीली अभिनेत्रीनं एका मुलाखतीत तिच्यावर कशाप्रकारे डिप्रेशनची वेळ आली होती याबद्दल सांगितलं आहे.

  मुंबई, 14 मार्च- स्टार प्रवाह वाहिनीचा पुरस्कार सोहळा नुकताच थाटात पार पडला. कलाकारांनी नटून थटून येऊन रेड कार्पेटवर थाटात हजेरील लावली. कलाकारांचे कामाचे कौतुक म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला आई कुठे काय करते   ( aai kuthe kay karte )  मालिकेती सर्व कलाकारांनी हजेरी लावली होती. मालिकेत अनघाची भूमिका साकारणीर अभिनेत्री अश्विनी महांगडे (ashwini mahangade) देखील यावेळी उपस्थित होती. यावेळी आश्विनीला ती साकारत असलेल्या अनघाविषयी आणि पुरस्कार सोहळ्याविषयी विचारण्यात आले. यावेळी तिनं तिच्या आयुष्यातील वाईट काळात तिच्यावर कशाप्रकारे डिप्रेशनची वेळ आली होती याबद्दल सांगितली आहे. एका पोर्टलनं याबद्दल वृत्त दिलं आहे. आश्विनी महांगडे या प्रश्नावर म्हणाली की, अनघा हा समाजातील अशा मुलींचा चेहरा आहे ज्या मुली घटस्फोटित आहेत डिप्रेशन मध्ये आहेत. त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरून समाजातील महिलांसाठी काम केलं आहे. त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा लग्न करण्याची संधी येते त्यावेळेला स्वतःला शांत करून एका नवीन कुटुंबात समाविष्ट होणं ह्या सगळ्या गोष्टी अनघाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. दुःख येत राहतात परंतु त्यामुळे जगणं थांबत नाही हेच सांगण्याच काम अनघाने केलं आहे. वाचा-'आशुतोष केळकर खरा आणि अनिरुद्धचाच राग का?', मिलिंद यांची पोस्ट चर्चेत जशी अनघाच्या आयुष्यात अनेक दुःख संकटं आली तसाच काळ माझ्याही आयुष्यात आला जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले. अनेक चढउतार अनुभवले. त्यावेळीही त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की, आपण नेहमी कलाक्षेत्रासाठी स्वतःला वाहुन न्यावं जर मी हे करत नसते तर मी नक्कीच डिप्रेशन मध्ये गेले असते. तुम्ही दुःखी असाल, तुमच्यावर कितीही मोठं संकट जरी आलं तरी तुम्हाला एकच सांगेन की तुम्ही काम सोडू नका.तुम्ही जितके कामात असाल तितके गुंतून राहता आणि वाईट विचार तुमच्यापासून दूर जातात. वाचा-9 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी....हृताने सांगितला अभिनय प्रवासाचा अनुभव अनघाच्या भूमिकेने मला चांगली लोकप्रियता मिळाली आहे आमचं सेटवरच वातावरण देखील खूप छान असतं. मी नेहमी दौऱ्यावर असते, काही सामाजिक कार्यात गुंतलेली असते त्यामुळे आई कुठे काय करते या मालिकेचा सेट हेच माझ्यासाठी घर आहे जिथे मी माझं काम आटोपल्यावर निवांत झोप घेते. सेटवरची कलाकार मंडळी मला खूप साहाय्य करतात अगदी यश पासून मालिकेचे दिग्दर्शक देखील सेटवर हलकंफूलकं वातावरण निर्माण करतात त्यामुळे हे काम करायला प्रोत्साहन मिळते.
  अनघामध्ये प्रेक्षक कुठं तरी अरुंधतीला पाहतात. त्यामुळे अनघाची भूमिका कमी काळातच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. अनघा देखील कुटुंबाची काळजी घेताना दिसते. असं करत असताना घरातील इतरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव देखील करून देताना दिसते.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या