मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Madhurani Prabhulkar: 'मला मार्ग सापडत नव्हता पण....', श्री रविशंकर यांच्या हस्ते सन्मान होताच व्यक्त झाली अरुंधती

Madhurani Prabhulkar: 'मला मार्ग सापडत नव्हता पण....', श्री रविशंकर यांच्या हस्ते सन्मान होताच व्यक्त झाली अरुंधती

मधुराणी प्रभुलकर

मधुराणी प्रभुलकर

Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar: 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका बनली आहे. या मालिकेचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेच्या माध्यमातून अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 5 फेब्रुवारी- 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका बनली आहे. या मालिकेचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेच्या माध्यमातून अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली आहे. मधुराणी प्रभुलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्रीच्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याबाबत प्रत्येक लहान-लहान अपडेट्स जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना आवडतं. अशातच मधुराणीबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री आपल्या प्रत्येक अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते . सेटवरील सहकलाकारांपासून ते कुटुंबियांपर्यंत सर्वांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळत असतं. आजही अभिनेत्रीने अशीच एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना खुश केलं आहे. अरुंधतीला नुकतंच अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला आहे. अभिनेत्रीने फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. शिवाय भलीमोठी एकपोस्टसुद्धा लिहली आहे.

(हे वाचा: Nagraj Manjule: ...अन धूर यायला लागला; नागराज मंजुळेंनी सांगितला लंडनच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील 'तो' किस्सा)

मधुराणी प्रभुलकर इन्स्टा पोस्ट-

दिव्यत्वाची प्रचितीजय गुरुदेव..पूज्य गुरुजी श्री श्री रविशंकर ह्याच्या हस्ते पुरस्कार प्राप्त करण्याचा एक अतिशय दैवी योग माझ्या आयुष्यात आला... त्यांच्या समोर गुरुवंदना गायले. त्यांचे आशीर्वाद लाभले ...माझ्या आनंदाला पारावार उरलेलं नाही.माझ्यासाठी गेलं वर्षं खूप काही शिकवून जाणारं होतं. टोकाचे मानसिक चढउतार अनुभवले. त्याचे तब्येतीवर होणारे परिणाम भोगले. ह्या प्रवासात माझ्या हे अगदी लक्षात येत होतं की मला स्वतः वर काम करायला हवंय. मनाची स्थिरता मिळवायला हवीय. मनाची ताकद वाढवायला हवीय. मला मार्ग सापडत नव्हता.आणि एक दिवस अचानक तो सापडला. पूज्य गुरुजी श्री श्री रविशंकर ह्याची सुदर्शन क्रिया.

मी खूप पूर्वी शिकले होतेच... पुन्हा एकदा शिकले आणि नियमित करू लागले . मग सहज समाधी ध्यान, मग Advance मेडिटेशन कोर्स.... ह्या सगळ्यामुळे मला काय आणि किती लाभ झालेत हे मला शब्दांत सांगता येणं कठीण आहे.जसजसा मी सराव करत होते, गुरुजींची अनेक lectures ऐकत होते , तशी त्यांना प्रत्यक्षात भेटायची इच्छा प्रबळ होत होती. अनेक काळ ते भारताबाहेर असतात, भारतात असले तर प्रचंड बिझी असतात .... कधी आणि कसे भेटणार ??? मनाततली इछा मनातच राहणार असे वाटत होते.आणि अचानक म्हणजे out of the blue म्हणतात तसा महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने श्री किरण जोशी ह्यांचा फोन आला आणि ते म्हणाले आम्ही असा असा कार्यक्रम करतोय त्यात विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्याना पुरस्कार देतोय, त्यात तुम्हाला घ्यायचाय आणि तो ही गुरुजींच्या हस्ते.

माझा विश्वास बसेना , मी पुन्हा एकदा सगळं विचारलं....माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. पण त्या दिवशी शूट असणार होतं , कसं होणार. पण म्हणतात न गुरू नी बोलावलं म्हंटल्यावर सगळं आपोआप घडत जातं मी सेटवर माझ्या मनातली ही इच्छा आमच्या दिग्दर्शकाना सांगितली , त्यांनीपण cooperate केलं , सगळं adjust करून मला ह्या सत्काराला जाता येईल असं बघितलं।मी इतकीच इच्छा व्यक्त केली होती की प्रत्यक्ष आशीर्वाद घेता यावेत.... पण लाभलं ते किती अद्भुत ...!! असं म्हणत अभिनेत्रीने आपला आनंद व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment