मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Milind Gawali : 'आज मै तुमको छोडूंगा नही'; अनिरुद्धमुळे मिलिंद गवळींसोबत घडला अजब प्रसंग

Milind Gawali : 'आज मै तुमको छोडूंगा नही'; अनिरुद्धमुळे मिलिंद गवळींसोबत घडला अजब प्रसंग

मिलिंद गवळी

मिलिंद गवळी

अनिरुद्धची भूमिका प्रेक्षकांना आवडत जरी असली तरी जास्त लोक त्याला नावं ठेवतात. मिलिंद गवळींना अनिरुद्धमुळे एका वेगळया प्रसंगाला सामोरे जावे लागले त्याबद्दल त्यांनी पोस्ट करत सांगितलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 2 ऑक्टोबर :  आई कुठे काय करते मालिकेतून सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले अभिनेते मिलिंद गवळी एव्हरग्रीन अभिनेते म्हणून ओळखले जात आहे. मालिकेत त्यांनी साकारलेल्या अनिरुद्धला तोड नाही. प्रेक्षकांनी अनिरुद्धला भरभरुन प्रेम दिलं आहे. मिलिंद गवळी सोशल मीडियावरही फार सक्रीय असतात. अनेक फोटो व्हिडीओ तसंच त्यांच्या भावना ते पोस्टमधून लिहित असतात. ते मालिकेतील सहकलाकारांबद्दल तसेच विविध किस्से, अनुभव नेहमीच शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात कोणी कलाकार नाही तर मिलिंद यांचं शेजाऱ्यांशी असलेल्या खास नात्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे.

मिलिंद गवळी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांसोबतचे छान फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे ते या व्हिडिओत गाताना दिसत आहे. ते 'ऐ जिंदगी गले लगा  ले' हे प्रसिद्ध गाणं  गात आहेत.  त्याचबरोबर कॅप्शनमध्ये त्यांच्यासोबतच्या छान आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांनी लिहिलंय कि, ''दोन महिन्यात दोन वर्ष पूर्ण होतील ठाण्याच्या या हार्मनी सिग्नेचर टावर मध्ये राहायला येऊन, "आई कुठे काय करते" शूटिंग ठाण्यात असल्यामुळे इथे ठाण्यात राहणं सोयीचं होतं, या बिल्डिंगमध्ये कोणीच परिचयाचं नव्हतं, मी माणूस घाणे असल्यामुळे माझा कोणाशी परिचय होईल याचीही शक्यता फारच कमी होती, पण एक दिवस आमच्या शेजारचे श्री प्रकाश राव लिफ्ट जवळ मला भेटले, मला बघताक्षणी ते जोरात ओरडले, मला म्हणाले "आज मै तुमको छोडूंगा नही, तुम लोगो ने मेरी बीवी को बहुत रुलाया है , मी म्हणालो "सर मै तो आपको पहचानता भी नही हुं " अरे वो आई कुठे काय करते देखती रहती और रोती रहती है''

हेही वाचा - Sukh Mhanje Nakki Kay Asta: गौरीसाठी धावून आली साक्षात अंबाबाई; दसऱ्यादिवशी दोघांच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण

त्यांनी पुढे म्हटलंय कि, मला हात धरून प्रेमाने घरी घेऊन गेले, त्यांच्या पत्नी विद्याताईंची , त्याचा मुलगा पुनित, सून पल्लवी, नात कियू, सगळ्या ची ओळख करून दिली,एक दिवस passage मध्ये fire Alarm वाजला आणि आम्ही सगळे धावत बाहेर आलो, आमच्या शेजारी राहत असलेली गौरी कदम ती आली आणि म्हणाली सॉरी मी देवासाठी धूप लावला होता त्यामुळे धूर झाला आणि म्हणून fire अलार्म वाजला, प्रकाशराव तिला म्हणाले "अच्छा हुआ अलाम बजा उस बहाने से बेटा तुम बहार तो आयी और हमारी पहचान हो गई,"मग काही महिन्यांनी गौरीचे आई-वडील श्री अरुण कदम आणि सौ उज्वला ताई इंडोनेशिया वरून आले, आणि तेव्हां पासून आत्ता नवरात्रीपर्यंत असा एकही सण गेला नहीं जो धुमधडाक्यात साजरा केला गेला नाही''

'' या बिल्डिंग मधल्या असंख्य फॅमिली ची ओळख झाली, उषा आंटी , कविता आंटी , वंदिता, कोमीलाजी सगळ्यांनी मिळून आम्हाला आपलंसं करून घेतलं,आमच्या मजल्यावरती सगळ्यांची दारं सताड उघडी असतात, अरुणजी आणि उज्वला ताईंच्या घरी आठवडा दोन आठवड्यात संगीताची सुरेख मैफिल जमते , त्यांच्यामुळे मला गाण्याची आवड निर्माण झाली आणि आता गाणं शिकायला मी सुरुवात केली, माझ्या एक्टिंग च्या या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये अनेक वर्ष अनेक गावांमध्ये , शहरांमध्ये प्रेमाने आपुलकीने आपलंस करणारी अनेक माणसं भेटली, पण या ठाण्यात ही माणसं कुटुंबाचा भाग झाली, अशा माणसांमुळे आयुष्याचा हा खडतर प्रवास सोपा वाटायला लागतो, या सगळ्यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि ऋणी आहे.''

First published:

Tags: Marathi entertainment