मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aai Kuthe Kay Karte : बाळाच्या बारश्यावरून देशमुखांच्या घरात राडा; कोण ठेवणार नाव? अनघानं दाखवला इंगा

Aai Kuthe Kay Karte : बाळाच्या बारश्यावरून देशमुखांच्या घरात राडा; कोण ठेवणार नाव? अनघानं दाखवला इंगा

aai kuthe kay karte

aai kuthe kay karte

छकुलीच्या बारश्याआधी घरात वेगळ्याच विषयावरून वातावरण तापणार आहे. आता छकुलीचं नाव काय आणि कोण ठेवणार?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  25 जानेवारी : स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते ही मालिका सध्या टेलिव्हिजनवर चर्चेत आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की घरात अनघा आणि अभिच्या बाळामुळे अरुंधती देशमुखांच्या घरी रहायला आली आहे. अरुंधती आल्यामुळे अनघाला देखील आधार मिळाला आहे. नुकतीच मालिकेत मकर संक्रांत साजरी झाली. देशमुखांच्या घरातील सगळ्यांनी एकत्र येत पंतग उडवण्याचा कार्यक्रम केला. अनिश देखील या कार्यक्रमात सहभागी झाला होता. आता देशमुखांच्या घरात अनघाच्या बाळाचं म्हणजेच छकुलीचं बारसं पाहायला मिळणार आहे. मकर संक्रातीच्या दिवशी आई कांचन दुसऱ्या दिवशी बारस करण्याचा प्रस्ताव मांडला आणि एकमतानं तो सहमत झाला.

देशमुखांच्या घरात छकुलीच्या बारश्याची धम्माल तर पाहायला मिळणारच आहे. त्याचप्रमाणे घरात हळदी कुंकू देखील पार पडणार आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अरुंधती तिचा आशुतोषबरोबर लग्न करण्याचा निर्णय सांगणार आहे. पण बारश्याआधी घरात वेगळ्याच विषयावरून वातावरण तापणार आहे. यात अनघा सगळ्या चांगलंच खडसावणार आहे.

हेही वाचा - सौंदर्य स्पर्धा जिंकण्याआधीच मिळाला पहिला सिनेमा; अभिनेत्री पूजा सावंतबद्दल या गोष्टी तुम्हाला माहितीच नसतील

आई कुठे काय करते मालिकेचा नवा एपिसोड अपडेट समोर आलाय. त्यात दाखवल्याप्रमाणा, घरात छकुलीच्या बारश्याची तयारी सुरू आहे. तेव्हा आप्पा म्हणतात, 'अरुंधती छकुलीचं पाळण्यातील नाव तू ठेवायंच आहे'. त्यावर अरुंधची आश्चर्य व्यक्त करते. तर अनिरुद्ध लगेच, 'आप्पा मी नाव ठरवलं आहे', असं म्हणतो.  संजना कांचनला सांगते की, 'आई मीही काही नावं काढली आहेत'. त्यावर यश तोडगा काढण्यासाठी म्हणतो, 'आपण चिठ्ठ्या टाकूया का?' त्यावर 'मी नाव ठरवलं आहे', असं अभि सांगतो. अभिच्या या निर्णयानंतर 'मला नाही चालणार. माझ्या मुलीचं नाव काय असेल हे मला न विचारता कुणीच नाही ठरवायचं', असं म्हणत अनघा अभिकडे पाहत खडासावते.

छकुलीच्या बारश्याआधीच घरात तिचं नाव काय ठेवणार यावरून आपआपसात वाद सुरू झाले आहेत. आता छकुलीचं बारसं कसं होणार? तिचं नाव नक्की कोण ठेवणार? अनघानं घेतलेला हा निर्णय सर्वांना पटणार का? हे येत्या भागात पाहणं महत्त्वाच ठरणार आहे. त्याचप्रमाणे नातीच्या बारश्याला अरुंधतीच्या तिच्या लग्नाचा निर्णय सांगितल्यानंतर सगळे काय प्रतिक्रिया देणार? याकडेही सर्वांचं लक्ष आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial