मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /aai kuthe kay karte : आईचं लग्न होताच लेकाचं ब्रेकअप; यश-गौरीचं लग्न कसं वाचवू शकेल अरुंधती?

aai kuthe kay karte : आईचं लग्न होताच लेकाचं ब्रेकअप; यश-गौरीचं लग्न कसं वाचवू शकेल अरुंधती?

aai kuthe kay karte

aai kuthe kay karte

देशमुखांच्या घरात अरुंधती नसल्यामुळे कांचनला तिची उणीव जाणवत आहे. तर इकडे यश मात्र अरुंधतीकडे सगळ्या गोष्टींचा खुलासा करताना दिसत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 मार्च : आई कुठे काय करते मालिकेत अरुंधती आणि आशुतोषचं लग्न झालं. लग्नानंतर आता मालिकेचं कथानक कसं पुढे सरकणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. दरम्यान एकीकडे अरुंधती आणि आशुतोषचा नवा संसार फुलत असताना दुसरीकडे देशमुखांची मंडळी अरुंधतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत. अरुंधतीनं तिचा नवा संसार सुरू केला असला तरी तिचं लक्ष, तिचा जीव तिच्या मुलांमध्ये गुंतला आहे. अभिचं लग्न झालं असलं तरी यश आणि ईशाची चिंता तिला सतावत असते. अशातच अरुंधतीचं लग्न होताच आता लेकाचा मात्र ब्रेकअप होताना दिसणार आहे. यश आणि गौरी त्यांच्या साखरपुडा मोडतात असं येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे.

अरुंधतीच्या लग्नानंतर आई कुठे काय करते मालिकेचं कथानक आता भावुक होताना दिसत आहे. देशमुखांच्या घरात अरुंधती नसल्यामुळे कांचनला तिची उणीव जाणवत आहे. तर इकडे यश मात्र अरुंधतीकडे सगळ्या गोष्टींचा खुलासा करताना दिसत आहे.

हेही वाचा - वडिलांनंतर नवऱ्यानं सोडली साथ; मुलांनीही फिरवली पाठ, अभिनेत्रीनं बालपणापासून सोसलं दु:ख

आई कुठे काय करते मालिकेच्या येणाऱ्या भागाचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात कांचन संजना आणि अनघाशी बोलताना भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कांचन संजना आणि अनघाला म्हणते, "उद्या गुढीपाडवा आहे. गुढी उभारून नैवेद्य दाखवायचा आहे. पुढच्या वर्षी संजना असेल की नाही माहिती नाही". अनघा असेल की नाही माहिती नाही. कांचनचे हे शब्द ऐकल्यानंतर संजना आणि अनघाला रडू येत. कांचन दोघींना मिठीत घेऊन रडते. तिघींचा हा हळवा क्षण प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणतो.

तर इतके यशच्या आयुष्यात मोठी उलथा पालथ होताना दिसणार आहे. यश आणि गौरी यांच्यात अनेक दिवसांपासून खटके उडाले होते. अशातच अमेरिकेला गौरी अचानक अरुंधतीच्या लग्नासाठी देशमुखांकडे येते. तिथेही यश गौरीला पाहून भावुक होतो. दोघांचं बोलणं होतं आणि यश तिला तुझा निर्णय झाल्याशिवाय तोंड दाखवू नको सांगतो. दरम्यान अरुंधतीच्या लग्नानंतर अचानक गौरी यशला सोडून अमेरिकेला निघून जाते.

इतके यश अरुंधतीकडे येतो आणि घडलेली सगळी घटना सांगतो,  यश अरुंधतीला म्हणतो, "आई काय चुकलं माझं? कुठे कमी पडलो मी?" यश गौरीने परत दिलेली साखरपुड्याची अगंठी अरुंधतीला दाखवतो आणि, "तिने ही अगंठी फक्त मला दिली आणि काहीच बोलली नाही", असं सांगतो. यावरून अरुंधती देखील शॉक होते. यावरून असं कळत आहे की गौरी आणि यश यांचा ब्रेकअप झाला आहे.  त्यामुळे आता मालिकेनं घेतलेल्या या नवीन वळणात पुढे काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial