मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Aai Kuthe Kay Karte : आधी पाणउतारा मग पाठवणी; अखेर अरुंधतीनं दाखवली अनिरुद्धला त्याची जागा

Aai Kuthe Kay Karte : आधी पाणउतारा मग पाठवणी; अखेर अरुंधतीनं दाखवली अनिरुद्धला त्याची जागा

aai kuthe kay karte

aai kuthe kay karte

इतके दिवस शांत बसलेली अरुंधती मात्र लग्न करून देशमुखांच्या घरातून बाहेर जाताना अनिरुद्धचा चांगलाच पाण उतारा करते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई,  14 मार्च : स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अखेर अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न थाटामाटात लागलं. देशमुखांच्या घरात अरुंधतीच्या लग्नाचा माहोल सुरू होता. आधी विरोध करणारे शेवटी सगळेच अरुंधतीच्या लग्नाला तयार झाले. कांचननं देखील अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाला होकार देत अरुंधतीचं कन्यादान केलं. अनिरुद्ध पहिल्यापासून अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाच्या विरोधात होता. आपल्या धाकात राहणारी, नेहमी आपलं ऐकणारी, स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला घाबरणारी अरुंधती आता दुसरी लग्न करते म्हटल्यावर अनिरुद्ध पहिल्यापासून तिचा द्वेष करत होता. त्याने लग्नात देखील अरुंधतीचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही.

देशमुखांची सून, अनिरुद्धची बायको असताना अरुंधतीनं अनिरुद्धचं खूप ऐकून घेतलं होतं. त्यानंतर घरातून बाहेर पडल्यानंतर, घटस्फोट घेतल्यानंतरही अनिरुद्ध तिला नको नको ते बोलत आला आहे. तिनं वेळोवेळी त्याला खडे बोल सुनावले देखील. पण लग्नाच्या दिवशी अरुंधतीची पाठवणी करताना मात्र अनिरुद्ध तिची वाट अडवून तिला तिच्या लग्नाबद्दल तिला सुनावू लागतो. इतके दिवस शांत बसलेली अरुंधती मात्र लग्न करून देशमुखांच्या घरातून बाहेर जाताना अनिरुद्धचा चांगलाच पाण उतारा करते.

हेही वाचा - अरुंधतीच्या रोमँटिक उखाण्याची प्रेक्षक पाहत होते वाट; उखाणा ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी लावली अशी वाट

येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की, अरुंधती घराची शेवटची भेट घेण्यासाठी तिच्या खोलीत येते. तेव्हा अनिरुद्ध तिथे येतो आणि तिला बोलू लागलो. तेव्हा अरुंधती त्याला खडसावत बोलते, "झालं बोलून? बाजूला व्हा. माझे जयमान माझी खाली वाट पाहत आहेत आणि अशा परक्या विवाहित बाईची वाट अडवताय तुम्ही. बाजूला व्हा"

"माझ्या आयुष्याची सर्कस झाली. पण असं झालं नसतं तर बरंच झालं असतं.  माझ्या सर्कशीत माझ्या आजूबाजूला माझी म्हणता येतील अशी माझी चार माणसं आहेत माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी. माझा हात धरून मला आधार देणारी पण तुमचं काय? तुम्ही एकटे पडले आहात अनिरुद्ध. आता एक काम करा तुमचा हा जो गैरसमज आहे ना, सिंहासन असो वा नसो राजा मीच. या गैरसमजात आयुष्यभर आनंदात राहा. चुकून कधी तुम्ही आरशात पाहिलं आणि तुमच्या लक्षात आलं की आपल्या डोक्यावर मुकूटच नाहीये. आपण राजाच नाहीये आणि आपली प्रजा आपली गुलामच नाहीये. तर उद्धवस्थ व्हाल तुम्ही. त्यामुळे मला नाही तर शुभेच्छांची गरज तुम्हाला आहे", असं म्हणत अनिरुद्धचा चांगलाच पाण उतारा करते.

त्याचप्रमाणे निघता निघता अरुंधती अनिरुद्धला सल्ला देखील देते. म्हणते, "अरे अरे भरल्या घरात तुम्ही एटके पडला आहात अनिरुद्ध. काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा". आता अरुंधतीच्या बोललेल्याचा अनिरुद्धवर काही परिणाम होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial