मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'अ' वरुन नाही तर 'या' अक्षरावरून अरुंधतीनं ठेवलं नातीचं नाव; मालिकेत बारश्याची धम्माल

'अ' वरुन नाही तर 'या' अक्षरावरून अरुंधतीनं ठेवलं नातीचं नाव; मालिकेत बारश्याची धम्माल

आई कुठे काय करते

आई कुठे काय करते

बाळाच्या कानात कुर्रर्रर्रsss करून नाव ठेवण्याचा मान ईशाला मिळणार आहे. आत्या म्हणून ईशा तिच्या भाचीचं नाव तिच्या कानात सांगते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 जानेवारी : स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत सध्या अनघाच्या बाळाच्या बारश्याची लगबग पाहायला मिळत आहे. अनघा आणि अभिच्या मुलीच्या छकुलीच्या बारश्याला आज देशमुख कुटुंब एकत्र येणार आहे. आप्पा, कांचन आणि अनघाच्या आग्रहावरून अरुंधतीच बाळाचं नाव ठेवणार आहे. मालिकेत आज प्रेक्षकांना बारश्याची धम्माल पाहायला मिळणार आहे. आता अरुंधती नातीचं काय नाव ठेवते याकडे सर्वांचं लक्ष आहे.  छकुलीच्या आई वडिलांचं आणि आज्जी आजोबांचं नाव हे 'अ' या अक्षरावरून आहे मात्र नातीचं नाव अरुंधती 'अ' नाही तर वेगळ्याच अक्षरावरून ठेवणार आहे.

आई कुठे काय करते मालिकेचा एपिसोड अपडेट समोर आलाय. ज्यात छकुलीच्या बारश्यासाठी सगळे एकत्र आले आहेत.प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे, छकुलीच्या बारश्याला देशमुख कुटुंब तसंच विशाखा तसंच सुलेखा ताई, आशुतोष, नितीन आणि अनीष सगळे जमले आहेत. बाळाच्या कानात कुर्रर्रर्रsss करून नाव ठेवण्याचा मान ईशाला मिळणार आहे. आत्या म्हणून ईशा तिच्या भाचीचं नाव तिच्या कानात सांगते.

हेही वाचा - 2 दिवसात Pathaanची अनपेक्षित कमाई; काश्मीर खोऱ्यातील थिएटर्स 32 वर्षांनी झाले हाऊसफुल्ल

अनघा आणि अभिच्या मुलीचं नाव काय ठेवलं हे ऐकण्याची सर्वांना उत्सुकता असते. अरुंधती नातीचं नाव सांगणार तोच यश पुतणीच्या नावाचा सुंदर बोर्ड घेऊन येतो. अरुंधती आणि यश दोघे मिळून अनघाच्या बाळाचं नाव सगळ्यांना सांगतात. प्रोमोमध्ये बाळाचं पूर्ण नाव दाखवण्यात आलेलं नाही. पण 'नकी' असे दोन शब्द दिसत आहेत. यावरून बाळाचं नाव 'जानकी' असं ठेवल्याचं लक्षात येत आहे.

'अरुंधती- अनिरुद्ध' तर 'अनघा-अभिषेक' या सगळ्यांची नावं 'अ' या अक्षयरावरून आहेत. त्यामुळे छकुलीचं नाव देखील 'अ' या अक्षरावरून असेल असं सगळ्यांना वाटलं होतं. पण 'अ' नाही तर अरुंधतीनं नातीचं नाव 'ज' या अक्षरावरून ठेवलं आहे.

अरुंधतीनं नातीचं ठेवलेलं नाव आता सगळ्यांना आवडणार का? जानकी नाव ठेवण्यामागे काय असणार अरुंधतीचा विचार? हे सगळं आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची बोलणी देखील बारश्याच्या दिवशी होणार का? याची उत्सुकता सर्वांना आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial