मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Aai Kuthe Kay Karte : अरुच्या लग्नानंतर आप्पा भावुक; लग्नाच्या पहिल्याच रात्री अरुंधतीनं आशुतोषकडे मागितली 'ही' गोष्ट

Aai Kuthe Kay Karte : अरुच्या लग्नानंतर आप्पा भावुक; लग्नाच्या पहिल्याच रात्री अरुंधतीनं आशुतोषकडे मागितली 'ही' गोष्ट

aai kuthe kay karte

aai kuthe kay karte

अखेर आशुतोषबरोबर लग्न करून अरुंधती केळकरांची सून झाली. दरम्यान लग्नाच्या पहिल्याच रात्री अरुंधतीनं आशुतोषकडे एका गोष्टी मागणी केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई,  16 मार्च : मागील अनेक दिवस अरुंधतीचं लग्न हा विषय मराठी टेलिव्हिजनवर चर्चेचा विषय बनला आहे. आई कुठे काय करते ही मालिका सध्या टीआरपीमध्ये देखील पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेत अरुंधतीच्या लग्नाचे वारे वाहत होते. अखेर अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न झालं असून दोघांच्या सुखी संसाराला सुरूवात झाली आहे. देशमुखांनी अरुंधतीचं लग्न लावून तिची आशुतोष केळकरांच्या घरी पाठवणी देखील केली. जड अंत:करणानं सर्वांनी अरुंधतीला निरोप दिला.  लेकीची पाठवणी करताना आप्पा, कांचनसह संजना देखील भावुक झाली होती. अखेर आशुतोषबरोबर लग्न करून अरुंधती केळकरांची सून झाली. दरम्यान लग्नाच्या पहिल्याच रात्री अरुंधतीनं आशुतोषकडे एका गोष्टी मागणी केली. दोघांमधली भावुक आणि प्रेमळ संवाद समोर आला आहे.

आई कुठे काय करते मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे ज्यात पाहायला मिळतंय की अरुंधतीची पाठवणी केल्यानंतर इतके देशमुखांच्या घरी सगळे भावुक झाले आहेत. आप्पा अरुंधतीच्या आयुष्यात सुखाचे क्षण आल्यानं फार आनंदी आहेत. ते कांचनला म्हणतात, "माणसाला सुखी होण्यासाठी ना बाकी सगळ्यांपेक्षा एक मनापासून प्रेम करणारा माणूस हवा असतो. आणि अरुंधतीला असा माणूस मिळाला आहे जो तिच्यावर मनापासून आणि प्रामाणिकपणे प्रेम करतो".

हेही वाचा - Punam Chandorkar : अरुंधतीला लग्न करण्याची गरजच काय आहे? ऑनस्क्रिन नणंदनं सांगितली मन की बात

तर इकडे केळकरांच्या घरात अरुंधतीचं थाटात आगमन होतं. अरुंधती केळकरांची सून म्हणून गृहप्रवेश करते. आशुतोषसाठी ती उखाणा घेते. घरी सगळे अरुंधती आणि आशतोषभोवती फेर धरून नाचतात. मोठ्या आनंदानं अरुंधती केळकरांच्या घराचं माप ओलांडते.

दरम्यान अरुंधती ही आशुतोषची बायको म्हणून पहिल्यांदा केळकरांच्या घरी येते. तिला या घरात काही कमी पडू नये, तिला वेगळं काही वाटू नये म्हणून आशुतोष तिच्याशी बोलतो.  लग्नाच्या पहिल्याच रात्री आशुतोष आणि अरुंधतीमध्ये प्रेमाचा संवाद होतो. आशुतोष मोठ्या काळजीनं आपुलकीनं अरुंधतीला म्हणतो, "या घरात वावरत असताना तू कोणतीही फॉरमेलिटी मनात ठेवू नकोस. तुला जे काही हवं आहे ते तू मागून घे, स्पष्टपणे सांग. कारण तू जर सांगितलं नाहीस तर ते मला कसं कळणार". यावर अरुंधती आशुतोषला सांगते, "तुम्ही जसे आहात तसे राहा. मला तेवढं पुरे आहे".

आशुतोष आणि अरुंधतीचं लग्न झाल्यानंतर आता मालिकेचं कथानक काय वळण घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मालिकेत अरुंधतीचं लग्न होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष होतं पण अखेर अरुंधतीचं लग्न झालं. आता अरुंधतीच्या लग्नानंतर मालिकेत काय काय घडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial