मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अखेर लेकानं स्वीकारलं आईचं दुसरं लग्न; अभि-अरुंधतीचा भावुक क्षण, आता काय करणार अनिरुद्ध?

अखेर लेकानं स्वीकारलं आईचं दुसरं लग्न; अभि-अरुंधतीचा भावुक क्षण, आता काय करणार अनिरुद्ध?

aai kuthe kay karte

aai kuthe kay karte

येणाऱ्या भागात आपल्याला अभि अरुंधतीची माफी मागत दोघांचं नातं स्वीकारताना दिसणार आहे. अभि देखील अरुंधतीच्या बाजूनं गेल्यानंतर आता अनिरुद्ध काय करणार?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 मार्च :  आई कुठे काय करते या टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकेत सध्या नवीन ट्रॅक सुरू झाला आहे. नुकतंच अरुंधती आणि आशुतोषचं लग्न झालं आहे. देशमुखांच्या घरात दोघांचं लग्न झाल्यानंतर आता मालिकेनं वेगळं वळण घेतलं आहे. आपण पाहिलं तर अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाला देशमुखांच्या घरात अनिरुद्ध आणि अभि शेटवपर्यंत तयार नव्हते. दोघांनी कोटाचा विरोध करत अरुंधतीला खूप वाईट शब्दांत ऐकवलं. कांचन देखील अरुंधतीच्या लग्नासाठी आधी तयार नव्हती. मात्र तिनं देखील शेवटी अरुंधतीचं कन्यादान स्वत:च्या हातानं केलं. तशी कांचनला तिची चूक कळली आणि तिनं दोघांच्या नात्याला होकार दिला. दोघांचं नातं स्वीकारलं त्याचप्रमाणे आता अभिला देखील अरुंधतीची बाजू कळणार आहे. येणाऱ्या भागात आपल्याला अभि अरुंधतीची माफी मागत दोघांचं नातं स्वीकारताना दिसणार आहे.

मालिकेच्या मागील भागात आपण पाहिलं की, अरुंधती लग्नानंतर पहिल्यांदा देशमुखांच्या घरात येते. देशमुखांच्या घरी येताच अरुंधतीला पाहून सगळेच खुश होतात. अभि जानकीला घेऊन हॉलमध्ये येतो. जानकीला पाहून अरुंधतीला घेण्यासाठी पुढे जाते तोच अभि तिला जानकीला भेटू देत नाही. अभि अरुंधतीला खूप गोष्टी सुनावतो. ज्यानं अरुंधती दुखावली जाते. त्यानंतर अनघा अभिला समाजावते. अनघाच्या बोललण्यानंतर अभिला त्याची चूक कळते.

हेही वाचा -  हमाल दे धमाल! बिग बींच्या मेकअप आर्टिस्टकडे 1.4 लाखांचा फोन, दादर स्टेशनवर घेऊन गेला अन्...

येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की, अभि हा जानकी आणि अनघाला घेऊन अरुंधती आणि आशुतोषच्या घरी जातो. अरुंधतीला पाहून अभि तिला थेट मिठीच मारतो. अभिचं हे वागणं पाहून अरुंधतीला काही क्षण काय करावं हे कळत नाही. अभि आशुतोषकडे जाते आणि रडत रडत त्याला म्हणतो, "तुम्ही माझ्या आईची काळजी घेता, तिच्यावर मनापासून प्रेम करता हे पटलंय मला. तिची साथ द्या. तिला कधीच दुखावू नका".

तर इकडे देशमुखांच्या घरात अनिरुद्ध अभिबरोबर हॉस्पिटलच्या जायच्या तयारीत असतो. तेव्हा अनघाला त्याला बाहेर चालला आहेस का? असं विचारतो. "अभिबरोबर हॉस्पिटलला जातोय, पण अभि, जानकी आणि अनघा घरात दिसत नाहीयेत", असं अनिरुद्ध संजनाला म्हणतो. त्यावर संजना त्याला सांगते की, "अभि जानकी आणि अनघाला घेऊन अरुंधती आणि आशुतोषकडे गेला आहे. अभि अरुंतीला सॉरी म्हणायला गेला आहे. त्याला कळलं आहे की तो तिच्याशी चुकीचं वागला आहे".  संजनाचं हे बोलणं ऐकून अनिरुद्धच्या पायाखालची जमीन सरकते.

आता देशमुखांच्या घरातील सगळेच अरुंधतीच्या बाजूने आहेत. फक्त अनिरुद्ध तिच्या विरोधात आहे. आता अभिनं देखील आईचं दुसरं लग्न स्वीकारलं आहे म्हटल्यानंतर अनिरुद्धचा सपोर्ट सिस्टम तुटला आहे. आता अभि सुद्धा बरोबर नसताना अनिरुद्ध एकटा काय करणार? हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial