मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती घरच्यांसमोर देणार आशुतोषवरील प्रेमाची कबुली; काय असेल त्यांची प्रतिक्रिया?

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती घरच्यांसमोर देणार आशुतोषवरील प्रेमाची कबुली; काय असेल त्यांची प्रतिक्रिया?

आई कुठे काय करते

आई कुठे काय करते

'आई कुठे काय करते' मालिकेतील पुढच्या भागाची अपडेट समोर आली आहे. अरुंधती आणि आशुतोष यांच्याविषयी मोठी घडामोड घडणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 22 नोव्हेंबर : 'आई कुठे काय करते' ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. मालिकेत प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आयुष्यात काही ना काही प्रसंग घडत आहेतच. मालिका आईची असली, तरी आईभोवतीची पात्रंही तितकीच महत्त्वाची दाखवली जातात. सध्या मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांची वाढणारी जवळीक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. मालिकेतील प्रत्येक घडामोड सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल असते. अशातच 'आई कुठे काय करते' मालिकेतील पुढच्या भागाची अपडेट समोर आली आहे. अरुंधती आणि आशुतोष यांच्याविषयी मोठी घडामोड घडणार आहे.  याचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.

आशुतोषने नुकत्याच अरुंधतीला त्याच्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या होत्या. आयुष्याच्या वळणावर आपल्याला कधीतरी सोबतीची गरज लागते असं त्याने म्हटलं होतं. त्यानंतर आप्पांची अवस्था पाहून तिला ते पटलंही. त्यात यशनेदेखील तिची समजूत काढत तिने तिच्या पुढच्या आयुष्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं म्हटलं. आता अखेर अरुंधतीने तिचं पुढील आयुष्य आशुतोषसोबत घालवण्याचा निर्णय घेतला आहे. ती लवकरच आशुतोषसमोर तिचा निर्णय सांगणार आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ती आशुतोषला ही बातमी सांगणार आहे. आता तिने या दोघांविषयी मोठा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या भागात अरुंधती घरच्यांना तिचं आणि आशुतोषचं  सत्य सांगणार आहे.

हेही वाचा - क्या बात! टेलिव्हिजनच्या सर्वात लोकप्रिय प्रभू श्रीरामांसोबत झळकणार सुबोध भावे; पोस्ट करत म्हणाला...

मराठी पीआर या पेजच्या पुढच्या भागाचा प्रोमो पेजवर पोस्ट केला आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये पहायला मिळतंय की, अरुंधती आई, अनिरुद्ध, अप्पा, अभि आणि ईशा याना  समोर बसवून आपण आता पुढील आयुष्य आशुतोषसोबत घालवणार आहोत असा निर्णय सांगणार आहे.  आधीपासूनच आईवर रुसलेला अभिषेक तिच्या या निर्णयाला विरोध करणार याची तिला कल्पना आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi PR (@marathipr)

अभिसोबत अनिरुद्ध आणि कांचनदेखील तिच्या या निर्णयाविरोधात उभे राहणार याची जाणीव असूनही ती ठामपणे आपला निर्णय सगळ्यांना सांगणार आहे. आता देशमुख कुटुंबीय या निर्णयात नेहमीप्रमाणे तिची साथ देणार कि तिच्या विरुद्ध जाणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आता अनिरुद्ध नेमकं काय करणार? अनिरुद्ध संजनापासूनही घटस्फोट घेत आहे मात्र इकडे अरुंधती दुसऱ्या व्यक्तीसोबत पुन्हा संसार थाटणार आहे. ही गोष्ट त्याला मान्य होणार का? देशमुखांच्या घरातल्यांसोबतच मालिकेचे प्रेक्षक अरुंधतीच्या या निर्णयाला पाठिंबा देणार का, अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न अखेर होणार का हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तर दुसरीकडे अप्पांचा आजार आणि यश आणि गौरीचं तुटणारं नातं अरुंधती वाचवणार का ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Aai Kuthe Kay Karte, Marathi actress, Marathi entertainment