Home /News /entertainment /

अरुंधतीने सोडला घरावरील हक्क, 'आई कुठे काय करते' मालिकेत उत्कंठावर्धक वळण

अरुंधतीने सोडला घरावरील हक्क, 'आई कुठे काय करते' मालिकेत उत्कंठावर्धक वळण

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karate) ही मालिका दिवसेंदिवस अधिक रंजक बनत आहे. मालिका सध्या एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.

  मुंबई, 22 फेब्रुवारी- 'आई कुठे काय करते'   (Aai Kuthe Kay Karate)   ही मालिका दिवसेंदिवस अधिक रंजक बनत आहे. मालिका सध्या एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत दररोज मोठमोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. सध्या मालिकेत अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलेलं पाहायला मिळत होतं. परंतु आता समोर आलेल्या नव्या प्रोमोनुसार अरुंधती घरावरचं हक्क सोडताना दिसणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी मालिका 'आई कुठे काय करते' अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय बनली आहे. मालिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. आणि दिवसेंदिवस मालिकेच्या लोकप्रियतेत भर पडत असल्याचं पाहायला मिळतं. म्हणूनच मालिका टीआरपी रेसमध्ये सतत पुढे असते. सध्या मालिका एका फारच रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. अरुंधती या मुख्य व्यक्तिरेखेभोवती फिरणारी ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. मालिकेत नवं वळण- नुकतंच 'आई कुठे काय करते' मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या प्रोमोमध्ये संजना अरुंधतीला काही कागदपत्रे दाखवत सांगत आहे की, ' यामध्ये असं लिहिलंय तू तुझ्या मर्जीने आणि पूर्ण शुद्धीत या घरावरचा ताबा सासूबाईंच्या नावावर करतेयस..' शिवाय अरुंधतीच्या सासूबाईसुद्धा तिच्यावर नाराज आहेत आणि त्यामुळेच त्यांनीही अरुंधतीकडून आपल्या घराचा ताबा परत मागितला आहे. अरुंधती क्षणाचाही विलंब न करता घरावरील आपलं हक्क सोडते. आणि पुढे म्हणते, 'या घरात माझी काही हक्काची माणसे राहतात, त्यांच्यावरचा माझा हक्क तुम्ही कधीच काढून नाही घेऊ शकत'. आता गैरसमजूतीतुन अरुंधतीबद्दल निर्माण झालेला सासूबाईंचा राग किती दिवस राहणार आणि त्यातून त्या आणखी काय-काय करणार? आणि अरुंधती आपल्याच माणसांशी कशी टक्कर घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

  आशुतोषची प्रेमाची कबुली- या मालिकेत अनिरूद्धपासून घटस्फोट घेतल्यानंतर अरुंधतीने वेगळ्या आयुष्याला सुरूवात केली आहे.ही अरुंधती आता सक्षमपणे स्वतः च्या पायावर उभी आहे. तिचं नवीन गाण देखील आलं आहे. सगळीकडं तिचं कौतुक होत आहे. परंतु तिच्या आयुष्यातील अडचणी काही संपताना दिसत नाहीत. नुकतंच अनिरुद्धने अरुंधतीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे आता तिने देशमुखांचं घर सोडलं आहे. परंतु, हे घर सोडल्यानंतरसुद्धा तिला आशुतोषची खंबीर साथ मिळाली आहे. यांच्यातील मैत्री आणखीनच घट्ट होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे हळूहळू का होईना आशुतोषच्या मनात अरूंधतीविषयी प्रेम भावना निर्माण होऊ लागली आहे. पण तो कधी व्यक्त झाला नाही. मात्र आता थेट देशमुख कुटुंबासमोर आशुतोष अरुंधतीवरील आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Aai Kuthe Kay Karte, Marathi actress, Marathi entertainment, Tv serial

  पुढील बातम्या