मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Radhika Deshpande : 'एक दिवस मी तू होऊन जगावं'; अरुंधतीची लाडकी मैत्रीण वाढदिवसाच्या दिवशी पडली कोणाच्या प्रेमात?

Radhika Deshpande : 'एक दिवस मी तू होऊन जगावं'; अरुंधतीची लाडकी मैत्रीण वाढदिवसाच्या दिवशी पडली कोणाच्या प्रेमात?

आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधतीची मैत्रीण देविकानं सोशल मीडियावर तिच्या वाढदिवसाच्या दिवशी सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधतीची मैत्रीण देविकानं सोशल मीडियावर तिच्या वाढदिवसाच्या दिवशी सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधतीची मैत्रीण देविकानं सोशल मीडियावर तिच्या वाढदिवसाच्या दिवशी सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई, 17 ऑगस्ट:  आई कुठे काय करते ही मालिका स्टार प्रवाहवरील सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका आहे. मालिकेतील सर्वंच पात्र प्रेक्षकांना आपली वाटतात. सगळी पात्र एकाहून एक आहेत. प्रत्येकाला एक वेगळी शेड देण्यात आली आहे. अरुंधतीपासून आजी आप्पा, संजना, अरुंधतीची मैत्रीण अनिरुद्ध अशी वेगळेगळ्या विचारांची माणसं मालिकेत आपल्याला एकत्र पाहायला मिळतात.  मालिकेच अरुंधतीची सर्वात जवळची आणि लाडकी मैत्रीण देविका तुम्हाला आवडत असेल. देविका सध्या मालिकेत दिसत नसली तरी अरुंधतीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांना तिची खास एंट्री होतेच होते. देविका म्हणजेच अभिनेत्री राधिका देशपांडे.  आज राधिकाचा वाढदिवस असून तिला सगळेच शुभेच्छा देत आहेत.  राधिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. वाढदिवसाच्या दिवशी राधिकानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. राधिकाही उत्तम अभिनेत्री आहेच मात्र ती एक चांगली शिक्षिका देखील आहे. राधिका अनेक मुलींना अभिनयाचं शिक्षण देते. अनेक ठिकाणी अभिनयाचे वर्कशॉप घेत असते. तिच्या लाडक्या विद्यार्थीनींचे अनुभव देखील तिनं सोशल मीडियावर शेअर केले होते. त्याचप्रमाणे राधिक उत्तम कविता देखील लिहिते. अनेक ठिकाणी प्रवास करायला तिला आवडतो त्यामुळे तिनं अनेकवेळा प्रवास वर्णनही शेअर करत असते. अशीच एक सुंदर पोस्ट राधिकानं शेअर केली आहे. हेही वाचा - Mira Jagannath: बिग बॉस फेम मीरा जगन्नाथचं टेलिव्हिजनवर कमबॅक; मिळाली नवी मालिका राधिका निसर्गात रमणारी मुलगी आहे. वेळ मिळेल तशी ती सोलो ट्रिप देखील करत असते. काही दिवसांपूर्वीचं तिनं केदारनाथची सोलो ट्रिप केली होती.  तिला झाडांची आवड आहे. तिच्या घरी तिनं ब्रम्हकमळाचं झाड लावलं आहे. कृष्णकमळ हे फार अमूल्य फुल समजलं जातं. फुललेलं कृष्णकमळ पाहण्यासाठी नशीब लागतं असंही म्हटलं जातं.
राधिकानं फुललेल्या ब्रम्हकमळासह फोटो शेअर करत सुंदर पोस्ट शेअर केलीय. तिनं लिहिलंय, 'कृष्णकमळा... माझ्या बागेत तू यावंस, हसावं, नाचावं, झुलावं, खेळावं. तू रोज जन्म घ्यावास. तुझं वागणं, बोलणं, असणं असावं. एक दिवस मी तू हाऊन जगावं आणि तू मी होऊन. सख्या आज आपण एवढंच करावं का रे!? राधिकाचा वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर राधिका टेलिव्हिजनचा ओळखीचा चेहरा आहे. तिनं याआधी अनेक मराठी नाटक आणि सिनेमात कामं केली आहेत. 'व्हेनिला स्ट्राबेरी अँड चॉकेलट', 'होणार सून मी या घरची', 'स्वराज्य रक्षक संभाजी' सारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे.
First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

पुढील बातम्या