मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अरुंधतीला असं कधी पाहिलं आहे का? 'तो' व्हिडीओ पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

अरुंधतीला असं कधी पाहिलं आहे का? 'तो' व्हिडीओ पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

सर्वांची लाडकी अरुंधती

सर्वांची लाडकी अरुंधती

अरुंधतीनं आशुतोषसोबत लग्न करून नव्याने आयुष्याला सुरूवात केली आहे. तिच्या या निर्णयाला प्रेक्षकांनी देखील पाठींबा दर्शवला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 मार्च- 'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. या मालिकेचं कथानंक अरुंधतीभोवती फिरताना दिसत आहे. अरुंधतीनं आशुतोषसोबत लग्न करून नव्याने आयुष्याला सुरूवात केली आहे. तिच्या या निर्णयाला प्रेक्षकांनी देखील पाठींबा दर्शवला आहे. मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारताना दिसते. या मालिकेनं मधुराणीला महाराष्ट्राच्या घराघरात तर पोहचवलं आहे पण प्रेक्षकांच्या मनात देखील स्थान दिलं आहे. मधुराणीबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक असतात. मधुराणीनं नुकताच तिचा एक असा व्हिडिओ पोस्ट केला आहे जे पाहून प्रेक्षक तिच्या प्रेमात पडले आहेत.

मधुराणीला प्रेक्षक अरुंधती म्हणूनच ओळखतात. खरं तर ही तिच्या अभिनयाची पोहचपावतीच म्हणावी लागेल. मालिकेती साधी आणि सोज्वळ अरुंधती सर्वांनाच आवडते. मधुराणी देखील अरुंधतीप्रमाणेच साधी राहते. नुकताच तिनं तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

वाचा-मृत्यूच्या काही तासापूर्वी कोणाच्या बर्थडे पार्टीत गेली होती आकांक्षा दुबे?

मधुराणीनं इन्स्टावर टी ट्रीट म्हणत तिचा एक चहा पित असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये फ्रेश यलो रंगाचा कुर्ता आणि व्हाई सलवार घातली आहे. शिवाय तिनं मोकळे केस देखील सोडले आहेत. यामुळं ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा साधा लूक सर्वांना खूपच आवडला आहे.

एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे की, चहा च माहीत नाही पण तुम्ही फार गोड आहात❤️😍❤️🙌❤️😍❤️ तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की,❤️❤️❤️ sunday ची सुरुवात खूपच गोड झाली❤️❤️❤️❤️ अशा असंख्य कमेंट मधुराणीच्या या व्हिडिओवर आले आहे.

आई कुठे काय करते मालिका सध्या एका विशिष्ट वळणावर आहे. अरुंधीतचं आता दुसरं लग्न झालं आहे. आशुतोषसोबत तिनं आयुष्याला नव्याने सुरूवात केली आहे. अनिरूद्धपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय ते आजपर्यंतच्या प्रवासात आशुतोष नेहमीच तिच्या सोबत उभा राहिला आहे. देशमुखाचं घर सोडलं होतं तेव्हा देखील आशुतोष तिच्या मदतीला आला होता. आता तो तिचा फक्त मित्र नाही तर नवरा देखील आहे. त्यामुळं या दोघांच्यातील नातं आणखी काहीसं घट्ट झालं आहे. या दोघांच्या आयुष्यात आता पुढे काय घडणार याची देखील चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

>

आई कुठे काय करते ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेनं टीआरपीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. सोशल मीडियावर सतत मालिकेची चर्चा असते. मालिका अनेकजा कथानकातील बदलामुळे ट्रोल देखील होती. अरुंधतीच्या लग्नाचा निर्णय काही नेटकऱ्यांना रुचला नव्हता. काहींनी मात्र या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. या मालिकेच्या माध्यमातून लेखकाने एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केले आहे.

First published:
top videos

    Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment