Home /News /entertainment /

Aai Kuthe Kay Karte:अरुंधतीचा रेट्रो स्टाइल लुक व्हायरल; गालावरच्या खळीनं वेधलं लक्ष

Aai Kuthe Kay Karte:अरुंधतीचा रेट्रो स्टाइल लुक व्हायरल; गालावरच्या खळीनं वेधलं लक्ष

Aai Kuthe Kay Karte:अरुंधतीचा रेट्रो स्टाइल लुक व्हायरल; गालावरच्या खळीनं वेधलं लक्ष

Aai Kuthe Kay Karte:अरुंधतीचा रेट्रो स्टाइल लुक व्हायरल; गालावरच्या खळीनं वेधलं लक्ष

अरुंधतीच्या भूमिकेमुळे मधुराणी सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांना हजेरी लावत असते. नुकतच मधुराणीने एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी तिने केलेल्या रेट्रो स्टाइल लुकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  मुंबई, 27 मे: महाराष्ट्राच्या घराघरात आणि प्रत्येकाचा मनामानत आई बनून जी राज्य करतेय ती म्हणजे सर्वांची लाडकी 'अरुंधती' (Arundhati) 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतून सर्वांच्या मनावर राज्य करणारी अरुंधती प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणजेच अभिनेत्री 'मधुराणी प्रभुलकर गोखले' (Madhurani Prabhulkar Gokhale) मधुराणी ही अरुंधतीप्रमाणे एक गोड आई आहे. मधुराणी सतत नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून दररोज घडणाऱ्या घडामोडी ती तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अरुंधतीच्या भूमिकेमुळे मधुराणी सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांना हजेरी लावत असते. नुकतच मधुराणीने एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी तिने केलेल्या रेट्रो स्टाइल लुकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री मधुराणीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा ड्रेस आणि मेकअप करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिचा रेट्रो लुक कसा तयार झालाय हे तिने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  स्क्रिम कलरची साडी आणि त्यावर मरुन सिव्हलेस ब्लॉऊज मधुराणीने घातला आहे. साडी सावरत असताना तिचा शॉर्ट मनात भरुन राहतो आहे.  सुंदर साडीवर तिने गळ्यात नाजूक डायमंड नेकलेस घातला आहे.  केसात मधोमध भांग पाडून सिंपल हेअर स्टाइल करत मधुराणीने लाल गुलाबाची फुलं माळली आहेत. हेही वाचा - Marathi Superhit Serials: या मराठी Serials चा भाग होत्या आत्ताच्या आघाडीच्या अभिनेत्री, आता कमवत आहेत चिक्कार पैसे मधुराणीच्या या लुकने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या आहेत. इतकंच नाही तर मधुराणीच्या गालावर पडलेल्या गोड खळीवर देखील चाहते फिदा झाले आहेत.
  चंद्रा या गाण्यावर रिल बनवत मधुराणी साडीत छान मुरडत पोझेस देताना दिसतेय. तर रिलच्या शेवटी तिने तिच्या लाडक्या चाहत्यांसाठी फ्लाइंग किस करत थँक्यू देखील म्हटलं आहे.  मधुराणी कोणत्याही लुकमध्ये तितकीच सुंदर दिसते. तिच्या चेहऱ्यावरील हास्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणते. तिच्या या रेट्रो लुकवर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणीच्या पोस्टवर कमेंट करत युझर्सनी म्हटलंय, 'फार सुंदर','वॉव'. तर एका युझरने म्हटलंय, 'तुम्ही साडीत फार छान दिसता'. तर दुसऱ्या युझरने म्हटलंय, 'तुम्ही आमची खरी चंद्रा आहे'  एकूणच मधुराणीच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi entertainment, Tv serial

  पुढील बातम्या