मुंबई,26 जून- 'आई कुठे काय करते'
(Aai Kuthe Kay Karte) ही मालिका छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय मालिका बनली आहे. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. या मालिकेमुळे यातील कलाकरांना एक खास ओळख मिळाली आहे. मालिकेत अरुंधतीची
(Arundhati) भूमिका साकारून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर
(Madhurani Prabhulkar) घराघरात पोहोचली आहे. या मालिकेमुळे मधुराणी प्रचंड लोकप्रिय झाली आहे. परंतु काही एपिसोडमध्ये अरुंधती थोडी गायब असल्याचं दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे. याचं उत्तर आमच्याकडे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मधुराणी मालिकेतून का गायब आहे.
स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच पकड निर्माण केली आहे.त्यामुळेच मालिका टीआरपी रेसमध्ये सतत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असते. मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात आणि कुटुंबात सतत काही ना काही ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात. सुरुवातीला साधीभोळी असणारी अरुंधती आता मालिकेत स्वतःच्या पायावर उभी झाली आहे. सध्या ती मोठ्या आत्मविश्वासाने प्रत्येक निर्णय घेत आहे. ती प्रत्येक संकटाला धाडसाने सामोरं जात आहे.

मात्र सध्या सुरु असलेल्या काही एपिसोडमध्ये अरुंधतीचे सीन फारच कमी किंवा जवळजवळ दिसतच नाहीत. त्यामुळे चाहते नाराज आहेत. अरुंधती नेमकी कुठे गायब झाली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, अरुंधतीने आपल्या खाजगी कारणासाठी काही दिवस मालिकेतून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे ती मालिकेत परते पर्यंत सध्या संजना आणि अनिरुद्धवर फोकस केलं जात आहे. याबाबतचा रिपोर्ट मराठी सिरियल्स डॉट कॉमने दिला आहे. अरुंधती आपलं खाजगी काम आटोपून लवकरच मालिकेत परतणार आहे.
(हे वाचा:अनिरुद्धने संजनावर केला गंभीर आरोप; 'आई कुठे काय करते'चा महाएपिसोड )
सध्या मालिकेत काय सुरुय-
सध्या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.कारण यामध्ये अनिरुद्ध चक्क संजनावर आरोप लावताना दिसून येत आहे. वास्तविक मालिकेत अनघाचा अपघात झाला आहे. ती जिन्यावरून उतरताना संजनाचा धक्का लागून खाली पडते. त्याचवेळी संजनासुद्धा तिथेच असते. त्यामुळे अनिरुद्धने संजनावर असा आरोप केला आहे की तिने अनघाला मुद्दाम धक्का दिला आहे. अनिरुद्धचं ए बोलणं ऐकून सर्वच थक्क झाले आहेत. हा महाएपिसोड उद्या अर्थातच रविवारी 26 जूनला रात्री 8 वाजता प्रेक्षेपित होणार आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.