Home /News /entertainment /

सध्या 'आई' म्हणून ओळखली जातेय; सांगू शकाल हा कोण आहे की सुंदर अभिनेत्री?

सध्या 'आई' म्हणून ओळखली जातेय; सांगू शकाल हा कोण आहे की सुंदर अभिनेत्री?

ही मराठमोळी अभिनेत्री आता इतकी बदलली आहे की तिला या फोटोवरून ओळखणंही अशक्य आहे.

  मुंबई, 20 मे : सेलिब्रिटी आपल्या सोशल मीडियावर आपले बरेच फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. कुणी आपल्या फिल्म्सचं, सीरिअल्सचं प्रमोशन करतं. कुणी आपल्या लेटेस्ट फोटोशूट टाकतं, कुणी आपला फिटनेस, डाएट, ब्युटी सिक्रेट चाहत्यांसोबत शेअर करतं. तर कुणी आपला जुना फोटो शेअर करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देतं. सध्या अशाच एका अभिनेत्रीने आपला असाच एक जुना फोटो शेअर केला आहे (Marathi actress photo). अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या तरुणपणातील फोटो पोस्ट केला आहे. ज्यात ती पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसते आहे. हलकासा मेकअप, कानात डायमंड टॉप्स, गळ्यात मोत्यांची माळ, कपाळावर लहानशी टिकली असा तिचा साधा सिम्पल लूक. तिच्या साधेपणातही ती खूप सुंदर दिसते आहेत. तिला पाहताच कुणीही तिच्या प्रेमात पडेल असं तिचं हे सोज्वळ रूप. आज ही अभिनेत्री छोट्या पडद्यावरून आपल्याला घराघरात दिसते. ही ब्युटीफुल अभिनेत्री आज आईची भूमिका साकारते आहे. किंबहुना आई म्हणूनच तिला घराघरात ओळखली जाते आहे. आम्ही तर तुम्हाला आता हिंटही दिली आहे. तुम्ही सांगू शकाल का ही अभिनेत्री कोण आहे? हे वाचा - Photo: सलमानने उचलून घेतलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? नाव ऐकाल तर विश्वास बसणार नाही तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलंत तर उत्तमच. ओळखलं नसेल तर आता आम्ही तुम्हाला सांगतो. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नाही तर चक्क मधुराणी गोखले-प्रभुलकर आहे (Actress Madhurani Prabhulkar). आई कुठे काय करते (Aai kuthe kai karte) मालिकेत जी अरुंधतीची (Arundhati) भूमिका साकारते आहे.
  मधुराणीने दिलेल्या माहितीनुसार तिच्या पहिल्या फोटोशूटचा हा फोटो आहे. आता ती इतकी बदलली आहे की या फोटोवरून तिला ओळखणंही अशक्य झालं आहे. ही तीच आहे, यावरही अनेकांचा विश्वास बसत नाही आहे. हे वाचा - मुलीने 'जेठालाल'सारखा केला मेकअप, अस्सा जमला की ओळखताही येणं झालं कठीण हा फोटो काढण्यासाठी तिला किती स्ट्रगल करावा लागला हेसुद्धा तिने आपल्या या पोस्टमध्ये सांगितलं आहे. मधुराणी पोस्टमध्ये म्हणाली, "मुंबईत आल्यानंतर हे माझं पहिलंवहिलं फोटोशूट. सुकन्या कुलकर्णी मोने या माझ्या ज्येष्ठ सखीने मला अमेझिंग फोटोग्राफरचं नाव सुचवलं. आशिष सोमपुरा. त्यावेळी त्याच्या फी खूप वाटल्या होत्या. ते पैसे कसेबसेच जमवले होते त्यावेळी. पण त्याची माझी पहिल्या भेटीतच मैत्री झाली. मी नवीन होते तरी मला त्याने कम्फर्टेबल केलं. मुख्य म्हणजे तो त्याच्या मॉडेल्सला अतिशय आदराने वागवतो, ही त्याची मोठी क्वालिटी. या फोटोशूटवर मी पुढे काम केलं. खूप जाहिराती केल्या. हे शूट खूप खास आहे माझ्यासाठी. चल आशिष परत करूया असं एक मस्त फोटोशूट"
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress

  पुढील बातम्या