मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'आशुतोष केळकर खरा आणि अनिरुद्धचाच राग का?', मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत

'आशुतोष केळकर खरा आणि अनिरुद्धचाच राग का?', मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत

आई कुठे काय करते: अनिरुद्ध फेम मिलिंद गवळी यांनी नुकतीच अनिरुद्ध आणि संजना व अरुंधती आणि आशुतोष यांच्या नात्यावर एक भाष्य करणारी पोस्ट लिहिली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

आई कुठे काय करते: अनिरुद्ध फेम मिलिंद गवळी यांनी नुकतीच अनिरुद्ध आणि संजना व अरुंधती आणि आशुतोष यांच्या नात्यावर एक भाष्य करणारी पोस्ट लिहिली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

आई कुठे काय करते: अनिरुद्ध फेम मिलिंद गवळी यांनी नुकतीच अनिरुद्ध आणि संजना व अरुंधती आणि आशुतोष यांच्या नात्यावर एक भाष्य करणारी पोस्ट लिहिली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

  मुंबई, 14 मार्च- 'आई कुठे काय करते'  ( aai_kuthe kay karte ) ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर आहे. अनिरुद्धच्या वागण्यामुळे अरुंधतीला घर सोडावं लागलं. तसेच घटस्फोट घ्यावा लागला. शिवाय आता घर सोडल्यामुळे ती तिच्या माणसांपासून मुलांपासून देखील लांब झाली आहे. अशातच आशुतोषनं देखील अरुंधतीवरील प्रेमाची कबुली दिली तिही देशमुख कुटुंबासमोर. या सगळ्यामुळे सर्वजण अरुंधतीच्या विरोधात गेले आहेत. अरुंधतीच्या आयुष्यातल्या या सगळ्या चढ उताराला प्रेक्षक अनिरूद्धला जबाबदार धरताना दिसतात. नेहमी त्याला सुनवताना दिसतात. अनिरुद्धची भूमिका मालिकेत अभिनेते मिलिंद गवळी साकारताना दिसतात. त्यांना अनिरुद्धच्या नकारात्मक भूमिकेमुळे अनेकदा सोशल मीडियावलर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. आता मिलिंद गवळी यांनी (Milind Gawali Latest Post)  नुकतीच अनिरुद्ध आणि संजना व अरुंधती आणि आशुतोष यांच्या नात्यावर एक भाष्य करणारी पोस्ट लिहिली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. काय म्हणाले आहेत नेमके मिलिंद गवळी त्यांच्या पोस्टमध्ये ? मिलिंद गवळी यांनी इन्स्टावर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की, "अनिरुद्ध देशमुख‌ ने भाग पाडलं आशुतोष केळकर ला त्याचं अरुंधती वरचं प्रेम व्यक्त करायला"चला आता आशुतोष केळकर ने सगळ्यांसमोर आपलं 27 वर्षापासूनचं अरुंधती वरचं प्रेम व्यक्त केलं. वाचा-'राजा राणीची गं जोडी'तील जादूचं कोल्हापूरशी खास नातं, जाणून घ्या त्याबद्दल आज अरुंधतीला सुद्धा ऐकल्यावर धक्का बसला,आज अनिरुद्ध जे ओरडून ओरडून सांगत होता तेच खरं झाल्यासारखं वाटलं,पण अनिरुद्ध चारी खरं झालं असलं तरी,काही नाती प्रेमावर आधारित असतात पण त्यात फार गुंतागुंत असते, तिथे काय योग्य , काय अयोग्य , कोण बरोबर कोण चुकीचा हा मुद्दाच नसतो, खरं खोटं नसतं.किती interesting आहे हे सगळं,आता अनिरुद्ध चा मुद्दा खरा ठरला,पण तरीसुद्धा सामान्य माणूसाला आशुतोष केळकर खरा वाटतो,त्याच्याविषयी राग वाटत नाही, राग अनिरुद्धचाच येतो, का असं होत असेल बरं,कारण प्रेम करणं अजिबात चुकीचं नाही आहे हे प्रत्येकाला माहिती,त्यामुळे आशुतोषचं अरुंधती वरचं प्रेम कोणालाच खटकत नाही,पण ज्या वेळेला अनिरुद्ध संजना वर प्रेम करत होता ते प्रेम मात्र सगळ्यांना खटकत होतं,बघताना आपण किती वेगळ्या दृष्टिकोनातून या दोन्हीं प्रेमाकडे बघतो,त्यामुळे मला असं वाटतं प्रेम करणारा आणि त्याचं प्रेमResponsible असेल तर ते प्रेम प्रत्येकाला हवहवसं वाटतं ,त्यात काही चुकीचं वाटत नाही,आशुतोष केळकर च प्रेम हे रिस्पॉन्सिबल, किंवा unconditional आहे,आणि अनिरुद्ध देशमुखचं प्रेम हे irresponsible किंवा conditional आहे,स्वतःच्या स्वार्थापोटी आहे म्हणून ते खूप जास्त खटकत असतं,अजून एक महत्त्वाचा मुद्दा,माणूस जर genuine , चांगला असेल , तर त्याचं प्रेम सुद्धा लोकांना आवडतं,माणूस जर अनिरुद्ध सारखा असेल तर त्याचं genuine प्रेम सुद्धा आपल्याला खटकतं.आणि प्रेमामध्ये जर sacrifices असेल त्याग असेल, तर ते सुंदरच वाटतं, आणिप्रेमामध्ये फक्त स्वार्थ असेल, तर ते वीभत्स , किंवा नकोसं वाटतं.
  अनिरुद्ध possessive झाला तर आशुतोष Permissive and demanding झाला. किती भिन्न भूमिका/ characters आहेत अनिरुद्ध आणि आशुतोष च्या, अनिरुद्ध नकोसा वाटतो आणि आशुतोष हवासा  वाटतो, @aai_kuthe_kay_karte_officialया सिरीयलची हीच तर गंमत आहे,प्रेक्षकांना ते स्वतः दिसतात, ते स्वतःला बघतात, ते स्वतःला अनुभवतात या भूमिकांमध्ये,आयुष्याच्या प्रवासामध्ये कधी माणसं अनिरुद्ध सारखी वागतात तर कधी ते आशुतोष सारखी वाहतात,वेळीच लक्षात आलं,तर सहज आपल्याला भूमिका बदलता येईल,आणि तेच प्रेम पवित्र होऊन जाईल,पण अनिरुद्ध देशमुख कधी त्याची भूमिका बदलतोय याची मी वाट बघतोय... त्यांच्या या पोस्टवर नेचकऱ्यांनी कमेंट करत अनिरुद्धची बाजू कशी चुकीची आहे हे सांगितले आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या