Home /News /entertainment /

Aai Kuthe Kay Karte च्या प्रसिद्ध या अभिनेत्याने सोडली मालिका? वाचा सविस्तर

Aai Kuthe Kay Karte च्या प्रसिद्ध या अभिनेत्याने सोडली मालिका? वाचा सविस्तर

'आई कुठे काय करते' या मालिकेत देशमुख कुटुंबाच्या जावयाची भूमिका साकारणारा अभिनेता आशिष कुलकर्णी याने मालिका सोडल्याची चर्चा आहे.

    मुंबई, 27 नोव्हेंबर: 'आई कुठे काय करते' या (Aai Kuthe Kay Karte) मालिका अल्पावधीच प्रसिद्ध झाली आहे. टीआरपीच्या रेसमध्ये देखील ही मालिका अव्वल राहिली आहे. दरम्यान या मालिकेतील पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. मुख्य पात्रांसह सहकलाकार देखील प्रेक्षकांना आवडतात. या मालिकेत देशमुख कुटुंबाच्या जावयाची भूमिका साकारणारा अभिनेता आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) याने मालिका सोडल्याची चर्चा आहे.  या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांसाठी आवडीचे आहे. आता या मालिकेत केदारची भूमिका साकारणारा आशिष कुलकर्णी याने मालिका सोडल्याचे वृत्त समोर आहे. या मालिकेतून घराघरात पोहोचलेला केदार अर्थात आशिष कुलकर्णी मालिका सोडतोय, हे वृत्त ऐकल्यावर चाहत्यांचीही नाराजी पाहायला मिळतेय. दरम्यान तो एका नवीन मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचीही चर्चा आहे. सोनी मराठीवर तुमची मुलगी काय करते? ही नवी मालिका येते आहे. नुकताच या मालिकेचा ट्रेलरही समोर आला आहे. या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत आशिष दिसणार असून त्यामुळेच आई कुठे काय करते ही मालिका सोडल्याची चर्चा आहे. लोकमतने याविषयी वृत्त दिले आहे. हे वाचा-Bigg Boss Marathi: 'सोनाली बाहेर काढेन...'सोनालीवर भडकले महेश मांजरेकर,पाह VIDEO मीडिया अहवालांनुसार, आशिष कुलकर्णीकडून याबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. पण आशिषनंतर केदारच्या भूमिकेत कोण दिसणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना आहे. सध्या आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीच्या कॉलेजमधील मित्राच्या एंट्रीमुळे नवं कथानक सुरू आहे. या आशुतोषच्या एंट्रीमुळे वेगळं वळण मालिकेने घेतलं आहे. अरुंधतीच्या गाण्याच्या प्रेमात असणारा आशुतोष सुरुवातीपासून तिची मदत करताना दिसत आहे. तिला तो गाण्याचीही ऑफर देतो. पण घरातील मंडळींनी तिचं त्याला वारंवार भेटणं खटकत आहे. त्यावरुन देशमुखांच्या घरात वाद होतायंत. अनेकदा ही मालिका सोशल मीडियावर चर्चेत असते. हे वाचा-Deepika Padukone ने खास कारणासाठी 'तमाशा'मध्ये घातलं होतं लाल स्वेटर... काही वेळा यातील प्रसंग आवडल्यामुळे तर काही वेळा ट्रोल झाल्यामुळे 'आई कुठे काय करते' या विषय नेटकरी करतच असतात. एक प्रेक्षकवर्ग या मालिकेने कमावला आहे एवढं मात्र खरं!
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या