मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'आई कुठे काय करते' मालिकेत खुलणार नवं नातं! अरुंधतीच्या आयुष्यात आशुतोषची एन्ट्री होताच अनिरुद्ध झाला अस्वस्थ

'आई कुठे काय करते' मालिकेत खुलणार नवं नातं! अरुंधतीच्या आयुष्यात आशुतोषची एन्ट्री होताच अनिरुद्ध झाला अस्वस्थ

स्टार प्रवाहवर 'आई कुठे काय करते' हि मालिका आपल्या भेटीला येते मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोबतच मालिका सतत टीआरपी रेसमध्ये पुढे असते. अशातच मालिकेत एक नवं वळण आलं आहे. मालिकेत कॉलेज मित्राची म्हजेच आशुतोषची धमाकेदार एन्ट्री झाली आहे.

स्टार प्रवाहवर 'आई कुठे काय करते' हि मालिका आपल्या भेटीला येते मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोबतच मालिका सतत टीआरपी रेसमध्ये पुढे असते. अशातच मालिकेत एक नवं वळण आलं आहे. मालिकेत कॉलेज मित्राची म्हजेच आशुतोषची धमाकेदार एन्ट्री झाली आहे.

स्टार प्रवाहवर 'आई कुठे काय करते' हि मालिका आपल्या भेटीला येते मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोबतच मालिका सतत टीआरपी रेसमध्ये पुढे असते. अशातच मालिकेत एक नवं वळण आलं आहे. मालिकेत कॉलेज मित्राची म्हजेच आशुतोषची धमाकेदार एन्ट्री झाली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई,3  नोव्हेंबर- मराठी मालिका   (Marathi Tv Show)  सध्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. त्यातीलच एक मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karate)  होय. या मालिकेने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवलेली आहे. मालिकेत दररोज येणाऱ्या ट्विस्ट अँड टर्न्सनी चाहत्यांना अक्षरशः खिळवून ठेवलं आहे. मालिकेत नुकताच अरुंधतीच्या कॉलेज फ्रेंडअर्थातच आशुतोषची एन्ट्री झाली आहे. मात्र त्याच्या येण्याने अनिरुद्ध अस्वस्थ दिसून येत आहे. त्यामुळे अरुंधती आणि अनिरुद्धमध्ये सर्वकाही ठीक होणार कि आशुतोष आणि अरुंधतीमध्ये नवं नातं फुलणार पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

स्टार प्रवाहवर 'आई कुठे काय करते' हि मालिका आपल्या भेटीला येते मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोबतच मालिका सतत टीआरपी रेसमध्ये पुढे असते. अशातच मालिकेत एक नवं वळण आलं आहे. मालिकेत कॉलेज मित्राची म्हजेच आशुतोषची धमाकेदार एन्ट्री झाली आहे. त्यामुळे मालिका आणखीनच रंजक बनली आहे. नुकताच स्टार प्रवाहने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'आई कुठे काय करते' मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो फारच इंटरेस्टिंग दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांची आणखीनच वाढली आहे.

(हे वाचा: 'या' अभिनेत्याची होणार अरुंधतीच्या आयुष्यात एन्ट्री; 'आई कुठे काय करते ...)

मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये आशुतोषची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. तर एका कार्यक्रमा दरम्यान आशुतोष आणि अरुंधती समोरा-समोर येतात. त्यावेळी आशुतोषला पटकन अरुंधतीची ओळख पटते. तो तिच्याशी संवाद साधतो आणि आपली ओळख पटवून देतो. त्यांनतर कॉलेजच्या काही आठवणी ताज्या होतात. अशातच अरुंधतीचं कुटुंबीय आशुतोषचं नाव घेऊन अरुंधतीची गंमत करताना दिसून येत आहेत.सोबतच असंही सांगताना दिसत आहेत, कि कॉलेजमध्ये असताना आशुतोषचं अरुंधतीच्या कवितांवर प्रचंड प्रेम होतं. परंतु कॉलेजनंतर तब्बल २६ वर्षांनी या दोघांची भेट झाली आहे. तर दुसरीकडे या दोघांमधील हे बॉण्डिंग पाहून अनिरुद्ध अस्वस्थ झालेला दिसत आहे. त्यामुळे मालिकेत काहीतरी खास पाहायला मिळणार हे नक्की. चाहते मालिकेतील या नवीन प्रवासासाठी फारच उत्सुक झाले आहेत.

(हे वाचा:Aai Kuthe Kay Karte New Twist : अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण; होणार ... )

आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीच्या जोडीला एका नव्या एंट्री अभिनेत्याची एंट्री झाली आहे. ओंकार गोवर्धन(Onkar Govardhan) हा आहे. ओंकार हा मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. झी युवावरील'लव्ह लग्न लोचा' या मालिकेत सुमित ही भूमिका साकारली होती. या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. तसेच ओंकारने 'सावित्री ज्योती' या मालिकेत ज्योतिराव फुले हि मुख्य भूमिका साकारली होती. त्यांनतर आता 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेत या अभिनेत्याला पाहण्यासाठी लोक फारच उत्सुक आहेत.याआधी समीर धर्माधिकारी हि भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती.

First published:

Tags: Marathi entertainment