• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Aai Kuthe Kay Karte मधील हा प्रसिद्ध अभिनेता घेणार मालिकेतून ब्रेक, हे आहे कारण

Aai Kuthe Kay Karte मधील हा प्रसिद्ध अभिनेता घेणार मालिकेतून ब्रेक, हे आहे कारण

'आई कुठे काय करते' मालिकेतील एक महत्त्वाचा कलाकार काही काळासाठी ब्रेक घेणार आसल्याची माहिती समोर आली आहे.

 • Share this:
  मुंबई. 17 ऑक्टोबर : छोट्या ट्या पडद्यावरील लोकप्रिय 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte Latest Episode)या मालिकेने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्मण केलं आहे. मालिकेचं उत्कृष्ट कथानक, एका स्त्रीची आपल्या संसारासाठी चाललेली धडपड आणि या कथेला न्याय देणारे अनुभवी कलाकार यामुळे मालिका घराघरात लोकप्रिय ठरतेय. ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर आहे. अशातच आता मालिकेतील एक कलाकार (abhishek deshmukh) काही काळासाठी ब्रेक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मालिकेत यशच्या भूमिकेत दिसणारा अभिषेक देशमुख काही काळ कामातून ब्रेक घेणार आहे. यशच्या भूमिकेत असलेल्या अभिषेक सध्या लंडनला गेला आहे. त्यामुळे तो मालिकेतून काही काळ लांब राहणार असल्याचं समोर येत आहे. मालिकेत यशचे पात्र सर्वांचे लाडके आहे त्याचप्रमाणे प्रक्षकांचा देखील यश आवडता आहे. त्यामुळे यशच्या जाण्याचा मालिकेवर काही परिणाम होणार का. हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.
  अभिषेकविषयी थोडसं.... अभिषेकचा जन्म जळगावचा आहे. पाच वर्षांचा असल्यापासून तो रंगभूमीवर वेगवेगळ्या भूमिका साकारत आहे. नाट्य शिबीरं आणि बालनाट्य स्पर्धांमध्ये त्यानं अभिनयाचे धडे गिरवले आहेत. महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो पुण्यात आला. त्यावेळी तो एकांकिका, नाटक याकडे वळला. काही नाटकांसाठी त्यानं पडद्यामागेही कामं केलं आहे. पुढील शिक्षणाकरिता तो आर्किटेक्चर कॉलेजसाठी मुंबईत आला. पदवीधर होऊन पुन्हा या क्षेत्राकडे वळायचं असं त्यानं ठरवलं होतं. त्यानंतर त्यानं अनेक नाटकं लिहिली आणि दिग्दर्शितही केली आहेत. वाचा- Madhuri Dixit ची 'या' व्यक्तीसाठी खास पोस्ट, VIDEO शेअर करत म्हणाली... 'ओ फ्रिदा' हे अभिषेकने लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं नाटक बल्गेरियामध्ये एक आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात निवडलं गेलं. तर त्याचं 'कर्वे बाय द वे' हे नाटकसुद्धा चांगलंच गाजलं. नाटकांसह तो मालिका, वेब सीरिज आणि चित्रपटांमध्येही दिसला आहे. सहा वर्षांपूर्वी त्यानं 'पसंत आहे मुलगी' या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली. तसंच 'सेफ जर्नी', 'सेक्स ड्रग्स अँड थिएटर', 'फोमो' या वेब सीरिज आणि ' 15 ऑगस्ट' या चित्रपटातही काम केलं आहे. यशच्या भूमिकेमुळे अभिषेक महाराष्ट्राच्या घरा घरात पोहचला. या मालिकेतील त्याच्या भूमिकेच तर कौतुक झालेच पण त्याच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले. आत मालिका एका वळणावर आली असताना तो मालिकेतून ब्रेक घेत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: