मुंबई, 29सप्टेंबर- 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karate) हि मराठी मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मालिकेने रसिकांना भुरळ घातली आहे. मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट येत असतात. त्यामुळे चाहतेही पाहण्यासाठी उत्सुक असतात. मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अरुंधती चक्क संजनाला मदतीचा हात देताना दिसत आहे.
View this post on Instagram
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. आपल्या मुलांच्या आणि पतीच्या चुका पोटात घेऊन एक आई कसं सर्व सांभाळून घेते. तिचं मन किती मोठं असतं. आणि ती आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी काय-काय करत असते. मात्र तरीसुद्धा तिला स्वतःच्या अस्तित्वसाठी पावलोपावली लढावं लागतं. हे सर्व या मालिकेतून दाखविण्यात आलं आहे.
(हे वाचा:'पदर, पदर... ' शिवलीला पाटीलचा जुना VIDEO व्हायरल; Bigg Boss'अंदाजाने उडवली जाते)
मालिकेतील मुख्य व्यक्त्रीरेखा अरुंधती म्हणजेच मालिकेतील आई, सतत आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे. अरुंधतीने आपला पूर्णवेळ आपला पती आणि मुलांच्या सेवेतचं घालवला आहे. त्यामुळे तिला तिचा असं काहीच करता आलेलं नाहीय. अशातच पती अनिरुद्ध एका दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडतो. आणि अरुंधतीच्या आयुष्यात संजना नावाचं एक मोठं वादळ येतं.अनिरुद्धची प्रेयसी संजना लग्न करून घरी आल्यापासून अरुंधतीच्या घरातील सर्व सुख समाधान नष्ट झालं आहे.
(हे वाचा:अक्षया देवधरचं 'याड लागलं'; सोशल मीडियावर VIDEO होतोय VIRAL)
दरम्यान मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये संजनाला त्याच्या ऑफिसमध्ये अधिकाऱ्याकडून चुकीची वागणूक मिळत असते. त्याला कंटाळाळून संजना नोकरी सोडण्याचा निर्णय घेत आहे. मात्र अरुंधती तिला आपल्या हक्काची आपल्या आदर सन्मानाची जाणीव करून देते. तसेच त्या माणसाला धडा शिकवण्याचा सल्ला देते. तिला धीर देते. इतकंच नव्हे तर या सर्व लढाईमध्ये आपण तिच्या सोबत असल्याचं सांगते. ती एकटी नसून मी आणि माझं कुटुंब तिच्यासोबत असल्याचं सांगते. अरुंधतीच्या या चांगुलपणाचा संजनावर काही परिणाम होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment