Home /News /entertainment /

संजनाने घर केलं स्वतःच्या नावावर, सत्य समोर येताच अनिरुद्धला मोठा धक्का

संजनाने घर केलं स्वतःच्या नावावर, सत्य समोर येताच अनिरुद्धला मोठा धक्का

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karate) या मालिकेत एका मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकसुद्धा फारच उत्सुक झाले आहेत. नुकतंच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे.

  मुंबई, 12 एप्रिल- 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karate) या मालिकेत एका मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकसुद्धा फारच उत्सुक झाले आहेत. नुकतंच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये संजनाने अनिरुद्धचं घर आपल्या नावावर करून घेतलं आहे. हा प्रोमो समोर येताच चाहते हा एपिसोड पाहण्यासाठी फारच आतुर झाले आहेत. स्टार प्रवाहवर प्रसारित होणारी 'आई कुठे काय करते' ही मालिका आपल्या नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्समुळे सतत चर्चेत असते. नुकतंच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढली आहे. या प्रोमोमध्ये संजना आणि अनिरुद्धमध्ये संवाद चालू असलेला दिसत आहे. यामध्ये संजना अनिरुद्धला सांगते की या घरावर आता माझा हक्क आहे, कादोपत्रीसुद्धा. त्यांनतर देशमुख घरातील सर्वांनाच धक्का बसतो. कारण संजनाने न सांगता ही उलाढाल केलेली असते. संजना अनिरुद्धलादेखील या गोष्टीचा सुगावा लागू देत नाही. त्यामुळे तोसुद्धा चकित झाला आहे. तर दुसरीकडे अरुंधती आशुतोषला भेटायला गेली आहे, ' यावेळी ती आशुतोषला म्हणत आहे, 'मी खूप विचार करते अनिरुद्ध आणि संजनाच्या भानगडीत आपण पडायचं नाही. आपला काहीही संबंध नाही. परंतु ती संजना मुद्दाम आपल्याला त्या गोष्टींमध्ये ओढते. त्यांनतर अरुंधती स्वतः निश्चय करत सांगते, की आपण आता कोणत्याही भानगडीत पडणार नाही. आणि स्वतःच्या भविष्याचा विचार करणार.
  View this post on Instagram

  A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

  तर नुकतंच झालेल्या एपिसोडमध्ये अनिरुद्ध आपल्या आईला म्हणतो तू जा आणि आप्पाना घेऊन ये. आणि जर ते येत नसतील तर तूसुद्धा निघून जा. यावेळी अरुंधतीसह घरातील सर्वच लोक चकित होतात. त्यांनतर अरुंधती आप्पानां घेण्यासाठी जाते. तेव्हा आप्पा आशुतोषजवळ आपल्या मुलीशी अर्थातच अरुंधतीसोबत लग्न करण्याची विनंती करत असतात. आप्पाचं बोलणं ऐकून आशुतोषसुद्धा गोंधळला दिसून येत आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment, Tv serial

  पुढील बातम्या