मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'आई कुठे काय करते' फेम संजनाच्या टिप टिप बरसा पानी लुकने सोशल मीडियावर लावली आग, video viral

'आई कुठे काय करते' फेम संजनाच्या टिप टिप बरसा पानी लुकने सोशल मीडियावर लावली आग, video viral

‘आई कुठे कुठे काय करते?’ मधील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बोल्ड आणि स्टाईलिश अभिनेत्री समजली जाते.

‘आई कुठे कुठे काय करते?’ मधील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बोल्ड आणि स्टाईलिश अभिनेत्री समजली जाते.

‘आई कुठे कुठे काय करते?’ मधील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बोल्ड आणि स्टाईलिश अभिनेत्री समजली जाते.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 20 डिसेंबर- आई कुठे काय करते  (Aai Kuthe Kay Karate) मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या आवडते आहे. मालिकेत अभिनेत्री रूपाली भोसले  (Rupali Bhosale) संजनाची भूमिका साकारत आहे. भूमिका जरी नकारात्मक असली तरी रूपालीने अभिनयाच्या जीवावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. रूपाली तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतेच रूपालीने एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचा एक व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रूपाली भोसलेने तिच्या इन्स्टावर ब्लू गाऊनमधील ग्लॅमरस फोटोशूटचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ टिप टिप बरसा पानी या गाण्यावर आहे. विशेष म्हणजे बाहेर देखील पाऊस पडताना दिसत आहे. रूपालीच्या या टिप टिप बरसा पानी व्हिडिओने सोशल मीडियावर मात्र आग लावली आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओवर कमेंटचा पाऊस सुरू आहे. तिच्या या अदांवर चाहते फिदा झाले आहेत.

बिग बॉस मराठीमुळे झळकलेले एक नाव म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले. अनेक मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री रुपाली भोसले ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. रूपाली तिच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.नेहमी हटके स्टाईलने ती चाहत्यांच मन जिंकते. कधी नथीचा नखरा तर कधी पारंपारिक साज तिचा पाहायला मिळतो.

वाचा-'फक्त 5 दिवस बाकी' म्हणत Hruta Durguleचा बॉयफ्रेंड प्रतिकसोबत Romantic अंदाज

‘आई कुठे कुठे काय करते?’ मधील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बोल्ड आणि स्टाईलिश अभिनेत्री समजली जाते. संजना हे नकारात्मक पात्र साकारत असली तरी रूपालीचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे.रुपाली भोसले हिने मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये आपली भूमिका गाजविली आहे. ‘कसमे वादे, बडी दूर से आये हैं, आयुषमान भव , तेनाली रामा’ या हिंदी मालिकांमध्ये रुपालीने काम केले आहे.रूपाली भोसलेने तीच्या अभिनयाच्या जोरावर आजवर अनेक जाहिराती आणि चित्रपटांमध्ये छोटे-मोठे पात्र साकारले आहेत.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, TV serials