मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आई कुठे काय करते: संजनाने चक्क अरुंधतीसाठी आणली आईच्या हातची खास बिर्याणी, Photo Viral

आई कुठे काय करते: संजनाने चक्क अरुंधतीसाठी आणली आईच्या हातची खास बिर्याणी, Photo Viral

 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karate) ने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. पडद्यावर जरी अरुंधती आणि संजना यांचे नातं ठीक नसले तरी पडद्यामागे या दोघी खूप धमाल करताना दिसतात.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 23 डिसेंबर - छोट्या पडद्यावरील मराठी मालिका 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karate) ने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आता या मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. मालिकेत सतत अरुंधतीला(Arundhati) आपल्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी लढावं लागतं. संजना अर्थातच तिच्या नवऱ्याची आधी प्रेयसी  आणि आताची पत्नी प्रत्येक वेळी तिच्या स्वाभिमानाला तडा देण्याचा प्रयत्न करत असते. या दोघींनमधला हा संघर्षचं प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. मात्र पडद्यावर जरी अरुंधती आणि संजना यांचे नातं ठीक नसले तरी पडद्यामागे या दोघी खूप धमाल करताना दिसतात. आता चक्क संजनाने अरुंधतीसाठी आईच्या हाताचा स्पेशल पदार्थ आणला आहे. दोघींनीही सेटवर यावर चांगलाच ताव माराला आहे. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karate) या मालिकेत मधुरीणी गोखले या अरूंधतीची भूमिका साकरतात. तर संजनाची नकारात्म भूमिका रूपाली चव्हाण साकारते. या दोघींच्या भूमिका वेगळ्या आहेत आणि या दोघींचे सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात चाहता वर्ग आहे. चक्क संजनाने अरुंधतीसाठी आईच्या हातची खास बिर्याणी आणली आहे. मग काय या दोघींना सेटवरच या बिर्याणीवर ताव मारला. दोघींपण एकाच प्लेट खातान दिसत आहे.

वाचा-Drishyam फेम अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट! Esther Anil च्या फोटोंवर खिळल्या नजरा

सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोघींना असं एकत्र जेवताना पाहून प्रेक्षकांना आश्चर्य वाटू शकते. मात्र हा पडद्यामागची सीन आहे. पडद्यावर तरी दोघी एकमेंकीच्या विरोधात दिसत असल्या तरी खऱ्या आय़ुष्यात या चांगल्या मैत्रिणी आहेत.

वाचा-झी मराठीवर लवकरच पाहायला मिळणार सत्यवान सावित्रीची पौराणिक मालिका

स्टार प्रवाहवर 'आई कुठे काय करते' ही मालिका आपल्या भेटीला येते. या मालिकेने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. मालिकेतील दररोज येणाऱ्या नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. अशातच मालिकेत अरुंधतीच्या मित्राची एंट्री झाली आहे. आता मालिकेचे कथानक या दोघांच्या भोवती फिरू लागले आहे. या दोघांच्यात असलेल्या निखळ मैत्रिची नेहमीच चर्चा होते.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials