‘आई कुठे काय करते’ फेम संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले नेहमीच सोशल मीडियावर नवनवीन व्हिडीओ शेयर करत असते. कधी डान्सचे तर कधी एक्सरसाईजचे व्हिडीओ शेयर करून ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. मात्र हा व्हिडीओ फारच खास आहे, कारण यामध्ये रुपाली पहिल्यांदा मोतीचूरचे लाडू वळत आहे. (हे वाचा: ‘रात्री 2 वाजता दिलिपजींचा फोन आला, अन्..’; सचिन यांनी सांगितली खास आठवण) तसेच ती म्हणते, ‘मला मोतीचूरचे लाडू फारच आवडतात. माझी खूप दिवसांपासून इच्छा होती, की मी स्वतः हे लाडू करावेत. मात्र अशी कधी वेळचं जमून नाही आली. मात्र आज माझी ही इच्छा पूर्ण झाली. तसेच रुपाली म्हणते, मी मोतीचूरचे लाडू बनवण्याची खूपच सोपी पद्धत शोधून काढली आहे. आणि तुम्हालाही ती जाणून घायची असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा. मी ती रेसिपी तुमच्यासाठी शेयर करेन’ रुपालीचा हा व्हिडीओला मोठी पसंती मिळत आहे. (हे वाचा:VIDEO:'जिया लागे ना' प्रियाच्या आवाजाने चाहते मंत्रमुग्ध; दिल्या अशा कमेंट्स... ) रुपालीला ‘बिग बॉस मराठी 2’ मधून मोठी लोकप्रियता मिळाली होती. ती एक उत्तम स्पर्धक समजली जात होती. तसेच रुपालीने हिंदीमधील ‘बडी दूर से आये है’ या मालिकेतसुद्धा काम केलं आहे. यामध्ये अभिनेता सुमित राघवन तिचा सह कलाकार होता. सध्या रुपाली भोसले ही अंकित मगरेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.